Viral Video : मार्केटमध्ये आलीये नवी हेअरस्टाईल; पाहताच तुम्हीही म्हणाल, ‘कुकु..डुकु!!’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी काहीही करायची जणू प्रथा सुरु झाली आहे. कधी कुणी अतरंगी नाचताना दिसतं, तर कधी कुणी कधी कुणी डायलॉगबाजी करतं, तर कधी कुणी जुगाड करताना दिसतं. इतकाच काय तर सोशल मीडियावर भांडणांचे व्हिडीओ सुद्धा तुफान व्हायरल होतात. एकंदरच काय की, सोशल मीडियावर कधीही काहीही पहायला मिळू शकतं. हे एक असं माध्यम आहे जिथे कोणत्याही विषयांवर चर्चा होऊ शकते. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये दिसणाऱ्या तरुणीने केलेली हेअरस्टाईल पाहून तुम्हाला हसू फुटेल.

मार्केटमध्ये नवी हेअर स्टाईल (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी मैदानात उभी आहे. ही मुलगी एका गाण्यावर रील रेकॉर्ड करतेय. मात्र ती जे गाणं म्हणतेय त्यापेक्षा जास्त तिची हेअरस्टाईल लक्ष वेधून घेते आहे. या मुलीने तिच्या केसांना कोंबडासारखा लूक देऊन केलेली ही हेअरस्टाईल पाहून कुणाच्याही तोंडून ‘कुकुडुकु’ येईल. लांबून या मुलीला पाहिलं तर कुणालाही वाटेल की, तिच्या डोक्यावर कोंबडा बसला आहे. पण हा कोंबडा बसला नाहीये तर तिच्या केसात साकारला आहे.

हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया X हँडलवर fewsecl8r नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सध्या मार्केटमध्ये आलेली हेअर स्टाइल. काय नाव देणार?’. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे आणि नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. (Viral Video) या व्हिडीओवर अनेक युजर्सने विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलंय, ‘अरे… मुर्गा हेअर स्टाइल’. तर आणखीन एकाने लिहिलंय, ‘हिने केसात कोंबडा पाळलाय’. तसे अन्य एकाने या हेअर स्टाईलला ‘मुर्गा कट’ तर आणखी एकाने ‘कुक्कड स्टाइल’ असे नाव दिले आहे.