Viral Video : घरगुती धोबीपछाड!! आधी घातली लाथ नंतर बुडवलं गटारात; बायकोने नवऱ्याला धु धु धुतला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंची काहीच कमी नाही. ज्यामध्ये कधी स्टंटबाजी, कधी विचित्र फूड फ्युजन, तर कधी अजब गजब जुगाड करतानाचे व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात. यांपैकी काही फेक तर काही रियल व्हिडिओ असतात. जे सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळवताना दिसतात. अशा व्हिडिओमध्ये अनेकदा भांडणांचे व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळतात. कधी प्राण्यांमध्ये तर कधी माणसांमध्ये चांगलीच जुंपलेली बघायला मिळते. यात नवरा- बायकोच्या भांडणाचे व्हिडीओ तर रोजचे झाले आहेत. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या नवरा बायकोचं भांडण सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

असं म्हणतात की नवरा बायकोत भांडण झालं तर त्यांच्यातलं प्रेम वाढतं. (Viral Video) पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहिला तर नवरा बायकोचं भांडण वाढल्यास गटारात लोळवून लोळवून मारलं जातं, असं दिसून येत आहे. अनेकदा किरकोळ वाद हाणामारीचे रूप घेत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. तसेच काहीसे या व्हिडिओतही पहायला मिळत आहे. अत्यंत विचित्र पद्धतीने हे नवरा बायको एकमेकांशी भांडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून असं वाटतंय आता हे एकमेकांचा जीव तरी घेतील नाहीतर जागेपणी तारे दाखवतील.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ gharkekalesh नावाच्या X हँडलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे? हे सांगता येणार नाही. मात्र या व्हिडिओत आपण पाहू शकतो की नवरा बायकोची रस्त्यावरच भांडण सुरू आहेत. हे भांडण एवढं वाढलंय की, त्यांच्यात अगदी हाणामारी सुरु आहे. (Viral Video) भांडताना त्यांचा तोल जाऊन दोघेही गटारात पडतात. पण तरीही दोघे एकमेकांना थांबायचं काही नाव घेत नाहीत. या व्हिडिओत हे नवरा बायको अक्षरशा एकमेकांना ‘खाऊ का गिळू’ करताना दिसत आहेत.

(Viral Video)हे दोघे एकमेकांना नक्की का मारत आहेत? हे काही समजलेलं नाही. शिवाय या नवरा बायकोचं खर भांडण झालंय की हा केवळ व्हिडिओसाठी केलेला अट्टाहास आहे? हे देखील अद्याप समजलेले नाही. मात्र काही असले तरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यावर अनेक नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. यातील काही मजेशीर तर काही ट्रोल करणाऱ्या आहेत.

या व्हिडिओवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, ‘हे दोघेही फार मजेशी पद्धतीने भांडत आहेत. मला तर वाटतंय की हे लोक कॉमेडी करत आहे. हे सगळं नाटक आहे’. तर आणखी एका यूजरने कमेंट करताना लिहिलं आहे की, ‘माझ्या लग्नानंतर माझी माझ्या बायकोसोबत अशी भांडणे झाली नाहीत तर मी घटस्फोट घेईन लक्षात ठेवा’. तसेच आणखी एका युजरने लिहिलं आहे की, ‘देव या जोडप्याला सुरक्षित ठेवो, सुबुद्धी देवो’. (Viral Video)