Viral Video : सिलेंडरखाली टिकलीचं पाकीट ठेवा आणि बघा चमत्कार; परिणाम पाहून व्हाल शॉक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) प्रत्येकाच्या घरात जेवण बनवण्यासाठी गॅस शेगडी तर नक्कीच असते. आता गॅस शेगडी आहे म्हणजे सिलेंडर सुद्धा असणार. हे सिलेंडर लोखंडापासून तयार केलेले असतात. वजनाला अत्यंत जड असलेले हे सिलेंडर स्वयंपाक घरात ठेवले जातात. हे सिलेंडर ज्या ठिकाणी ठेवलेले असतात त्या ठिकाणी अनेकदा गंजाचे डाग तयार होताना तुम्ही पाहिले असेल. शिवाय सिलेंडर इकडून तिकडे न्यायचा म्हटला की १०० टक्के फरशीवर चरे पडतात. त्यामुळे घराघरात दिसणारा हा सिलेंडर महिलांसाठी साफसफाईच्या दृष्टीने अनेकदा त्रासदायी ठरतो. हे गंजाचे डाग किचनच्या टाइल्स वर इतके घट्ट बसतात की ते निघताना नाकी नऊ येतात.

सिलेंडर ओढल्याने लादीवर पडणारे चरे दिसायला अतिशय खराब दिसतात. शिवाय यामुळे लादीची चमक खराब होते आणि रंग सुद्धा डागाळतो. अशावेळी घरातील स्त्रिया वेगवेगळे हॅक्स आणि ट्रिक्स शोधून काढतात. (Viral Video) ज्यामुळे त्यांना सिलेंडरमूळे पडणारे डाग काढता येतील. विविध ट्रिक्स वापरूनही हे जिद्दी आणि चिवट डाग काही जाण्याचं नाव घेत नाहीत. मग अशावेळी काय करायचं? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हा किचन जुगाड एकदा जरूर बघा. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. त्यापैकीच हा एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये एक भन्नाट किचन जुगाड पाहायला मिळते.

सिलेंडर पर बिंदी लगाते ही चौंक जाओगे 😱 बहुत जरुरी विडियो है एकबार जरूर देखे | Kitchen Hacks 2024
(Viral Video)मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे स्वयंपाक घरात ठेवल्या जाणाऱ्या सिलेंडरमुळे डाग पडू नये म्हणून काय करता येईल? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हायरल व्हिडिओमध्ये मिळेल. स्त्रिया आपला साज श्रुंगार पूर्ण करताना कपाळाला जी टिकली लावतात ती छोटीशी टिकली तुम्हाला या सिलेंडरच्या डागांपासून मुक्तता देऊ शकते. आता ती कशी हे तुम्ही व्हिडिओतच पहा.

अनेकदा सिलेंडरचे डाग घालवण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात पण हा हॅक वापरला तर सिलेंडरमूळे डाग पडणार नाहीत असा दावा या व्हिडीओ मेकरने केला आहे. तुमच्या दैनंदिन जीवनात हा हॅक फायद्याचा ठरणार आहे. (Viral Video) या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुमच्या घरातील सिलेंडर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी तुम्ही टिकलीच्या पाकिटाचा वापर करू शकता. या ठिकाणी तुम्हाला टिकलीचं जुनं पाकीट वापरायचं आहे. शिवाय तुम्ही टिकलीच्या पाकिटातील टिकल्या काढून सिलेंडरवर लावल्या तरीही चालतील.

आता हे रिकामी पाकीट तुम्ही सिलेंडरच्या खाली ठेवून हा सिलेंडर अगदी सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत सरकवून नेऊ शकता. यामुळे तुमच्या घरातील टाइल्स वर रेघोट्या पडणार नाहीत. शिवाय सिलेंडर सरकवून नेणं सुद्धा सोप्प होईल. सोशल मीडिया युट्यूबवर Amy’s Trendy Tips नावाच्या अकाउंट वरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत काही माहिती नाही. पण या व्हिडिओतला किचन जुगाड अनेक महिला ट्राय करू शकतात. (Viral Video)