Viral Video : तुमच्या नखांना लक्षवेधी बनवणारी नेलपेंट कशी बनवतात? ‘हा’ व्हिडीओ पहा, लगेच उत्तर मिळेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटत. तुम्हालाही वाटत असेलच. यात जर महिलांबद्दल बोलायचं झालं तर अनेक महिलांना नटायला थटायला आवडते. चार चौघात उठून दिसायला आवडते. जशी आय मेकअप नंतर डोळ्यांचे सौंदर्य आणखीच खुलून येते. अगदी तसेच नेलपॉलिशमुळे नखांचे सौंदर्य वाढते. त्यामुळे महिला वेगवेगळ्या रंगाच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नेलपेंट हमखास वापरतात. तुमच्या दैनंदिन पाहण्यातली ही नेलपेंट कशी बनते? हे तुम्हाला माहितेय का? नसेल माहित तर हा व्हिडीओ जरूर पहा.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये नेलपेंट कशी बनवली जाते? याची पूर्ण प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या रंगांचे मिश्रण करून कसे नवे रंग तयार करतात? ते देखील दाखवले आहे. तसेच मशीनद्वारे हे रंग एकत्र कसे होतात? याची पूर्ण कृती यामध्ये दाखवण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका पॅकेटमधून नेलपेंट बॉटल्स काढल्या जातात आणि त्यात नेलपेंट भरल्या जातात. त्यानंतर पूर्ण पॅकेजिंगनंतर या नेलपेंट बाजारात विक्रीसाठी पाठवल्या जातात.



सोशल मीडिया इंस्टाग्रामवर thefoodiehat नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत १६.२ दशलक्षाहून अधिक व्ह्यूजपर्यंत पोहोचला आहे. तसेच हा व्हिडीओ (Viral Video) अनेक नेटकरी व्हायला करताना दिसत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत ३ लाखांपेक्षा जास्त लाईक मिळाले आहेत आणि इतकेच नव्हे तर या व्हिडिओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देखील देताना दिसतात आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

या व्हायरल व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यांपैकी एका युजरने काम करणाऱ्या लोकांसाठी हातमोजे दान करण्याची इच्छा दाखवली आहे. त्याने लिहिलंय, ‘मी या लोकांना हातमोजे कसे दान देऊ शकतो?’ (Viral Video) तसेच आणखी एका युजरने म्हटलंय, ‘त्याचा वास खूप घाण येतो. हे लोक कसे काम करत असतील काय माहित?’ तर आणखी एकाने म्हटले, ‘ही काचेची बाटली खूप प्रदूषण निर्माण करते…’. एकाने लिहिले, ‘हे खूप कठीण आणि मेहनतीचे काम आहे’.