Viral Video : सलग काम करून रोबोटसुद्धा दमला; 20 तासाच्या वर्क स्ट्रेसनंतर थेट जमिनीवर कोसळला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) माणसाला कामात वेग येण्यासाठी आणि एखादे काम सोपे करण्यासाठी म्हणून तंत्रज्ञानाची गरज आहे. यानुसार आजकाल प्रत्येक क्षेत्रात यंत्र मानवांचा वापर केला जात आहे. यंत्रमानव म्हणजे काय? तर रोबोट. आज प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या कामांसाठी रोबोटचा वापर केला जात आहे. रोबोट हा माणसापेक्षा जास्त वेळ आणि जास्त जलद काम करू शकतो. म्हणून आजकाल माणसांची जागा रोबोट घेताना दिसत आहेत. असे असताना काम करून थेट जमिनीवर कोसळलेल्या रोबोटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

काम करून रोबोटसुद्धा दमला

जसजसा तंत्रज्ञान विकसित होत गेलं तसतसा त्याचा वापर वाढत गेला. आज अनेक यंत्रमानवांची निर्मिती करण्यात आली आहे. हे यंत्रमानव माणसापेक्षा जास्त काम करण्यासाठी सक्षम असल्याचे म्हटले जाते. (Viral Video) पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत दिसून आलं की, एक रोबोट तब्बल २० तास काम केल्यानंतर इतका दमला की थेट जमिनीवर कोसळला. या रोबोटचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. जो पाहून रोबोटच्या सक्षम असण्यावर प्रश्न उभे केले जात आहेत.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडिया एक्स हँडलवर Agility Robotics नावाच्या अकाउंटद्वारा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे हा रोबोट त्यांनीच बनवला आहे. त्यांनीच विकसित केलेल्या या रोबोटचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रोबोटचे नाव ‘डिजिट’ असे आहे. जो २० तासांची लांब शिफ्ट करण्याच्या क्षमतेचे प्रदर्शन करीत असताना ही घटना घडली. एका कपाटातून वस्तू उचलून काउंटरपर्यंत नेण्याचे काम हा रोबोट करत होता. दरम्यान, त्याची अपेक्षित तासांची क्षमता संपताच तो हातातील वस्तुनिशी खाली कोसळल्याचे या व्हिडिओत दिसते आहे.

या (Viral Video) व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिल्याप्रमाणे, या डिजिट रोबोटला प्रात्यक्षिकात ९९ टक्के यश मिळाले आहे. मात्र, हा रोबोट जेव्हा कोसळून पडला तेव्हा त्यामध्ये कोणतीही त्रुटी नव्हती. तर त्याची बॅटरी कमी असल्याने नियंत्रित शट- डाउन प्रक्रियेमुळे तो पडला’. असे काहीसे स्पष्टीकरण या कंपनीने दिलेले आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

आतापर्यंत हा व्हिडीओ अनेकांनी पाहिला आहे. इतकेच नव्हे तर अनेकांनी यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. दरम्यान एका युजरने म्हटले, ‘बघा! म्हणजे रोबोट्ससुद्धा इतके तास काम करून थकतो.. तर माणसाचं काय होत असेल?’. याशिवाय आणखी एकाने म्हटले की, ‘मित्रांनो, बघा कोणतेही तंत्रज्ञान कितीही विकसित असले तरी परिपूर्ण नसते’. हा (Viral Video) व्हिडीओ सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर देखील businessbulls.in नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ ट्रेंडिंग ठरतो आहे.