Viral Video : सौदीच्या रोबोटचे महिला पत्रकाराशी गैरवर्तन; लाईव्ह कार्यक्रमात केला चुकीचा स्पर्श

Viral Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजच्या डिजिटल युगात विविध क्षेत्रांमध्ये रोबोटचा वापर वाढला आहे. आजपर्यंत तुम्ही रोबोटवरील अनेक सिनेमे तसेच सिरीज पाहिले असतील. यामध्ये माणसाचं आयुष्य सुखकर करणाऱ्या रोबोटला पाहून तुम्हाला कायमच आश्चर्य वाटलं असेल. असेच आश्चर्यकारक रोबोट विविध क्षेत्रात सध्या कार्यरत आहेत. अनेक कामांसाठी अशा रोबोटचा वापर केला जातोय.

सौदी अरेबियातही मोहम्मद नावाचा एक पहिला पुरुष रोबोट तयार करण्यात आला आहे. AI क्षेत्रातील ही प्रगती नक्कीच कौतुकास्पद आहे. दरम्यान, या रोबोटच्या अनावरण कार्यक्रमात घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओत रोबोटने महिला पत्रकाराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे दिसून आले आहे.

सोशल मीडिया व्हायरल होणारा हा व्हिडिओ आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतोय की, मोहम्मद नावाच्या या रोबोटचा अनावरण सोहळा सुरू आहे. (Viral Video) या कार्यक्रमादरम्यान राविया अल कासिमी नावाची महिला पत्रकार या रोबोटजवळ उभी राहून रिपोर्टिंग करते आहे. यावेळी हा रोबोट तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसतोय. घडलेल्या प्रकाराने ती महिला पत्रकार थोडी हडबडल्याचे दिसून आले. मात्र चेहऱ्यावर एकही रेष येऊ न देता तिने आपले रिपोर्टिंग सुरू ठेवल्याचे दिसत आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि सर्व नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया (Viral Video)

सोशल मीडिया एक्स हॅण्डल Tansu Yegan नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये घडलेला प्रकार स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून यावर अनेक नेटकऱ्यांनी आपापली विविध मत प्रकट केली आहेत. यातील काही नेटकऱ्यांनी म्हटलंय की, हा सर्व प्रकार रोबोटमधील तांत्रिक अडचण वा समस्येमुळे झाला असावा.

तर काही नेटकऱ्यांनी या प्रकाराबाबत बोलताना हा प्रकार रोबोटच्या हातांची नैसर्गिक हालचाल झाल्यामुळे घडल्याचे म्हटले ते. त्यांनी म्हटलंय, ती रिपोर्टर रोबोटच्या अगदी जवळ उभी होती आणि या दरम्यान रोबोटच्या हातांची नैसर्गिक हालचाल झाल्यामुळे त्याचा हात तिला लागला. तर काही नेटकऱ्यांनी मात्र रोबोटच्या कृतीवर आश्चर्य व्यक्त केले आहे. शिवाय काहींनी रोबोटच्या कृत्यावर संताप दर्शवत AI च्या विकसित तंत्रज्ञानाला विचित्र असा टॅग दिला आहे. (Viral Video)