Viral Video : प्रेमी युगलाचे धावत्या बाईकवर अश्लील चाळे; स्टंटबाजी करताना पोलिसांनी पकडलं रंगे हात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) प्रेम एक अशी भावना आहे ज्यामध्ये बुडणारी व्यक्ती बाहेर येणं अशक्यच!! प्रेमात आकंठ बुडून आपला जीवही गेला तरी बेहत्तर, अशी अनेक जोडपी आपल्याला पहायला मिळतील. अनेकदा सोशल मीडियावर अशा काही जोडप्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रेम करण्याला बंधन नसलं तरी प्रेम कुठे करावं याची बंधने तोडून चालत नाहीत. पण अनेकदा प्रेमी युगल रेल्वेत, बसमध्ये किंवा मग बाईकवर अश्लील चाळे करताना दिसतात. जे पाहून संताप होतो. अशाच एका जोडप्याचा एक व्हिडीओ पोलिसांनी व्हायरल करून त्यांच्यावर वेळीच कारवाई केल्याचे समोर आले आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जो छत्तीसगडच्या जशपूरमधील आहे. या व्हिडिओत एक जोडपं केटीएम बाईकवरून हायवेवर प्रवास करताना दिसत आहे. यावेळी हे जोडपं धोकादायक रोमँटिक स्टंट करताना पकडले गेले आहेत. बाईकने प्रवास करताना तरुण गाडी चालवतोय तर त्याची प्रेयसी मात्र चक्क पेट्रोलच्या टाकीवर बसल्याचे दिसत आहे. (Viral Video) हायवेवर प्रवास करताना त्यांचे सुरु असलेले अश्लील चाळे त्यांच्या जीवावर कधी बेतले असते त्यांचं त्यांना कळलंसुद्धा नसतं. दरम्यान पोलिस अधीक्षकांनी (एसपी) त्यांना रंगेहात पकडले आणि त्यांच्या कारवाई केल्याचे समजत आहे.

पोलिसांनी केली कारवाई

एसपी जशपूर शशी मोहन सिंग यांनी धोकादायक रोमँटिक स्टंट करणाऱ्या या जोडपायला त्यांच्या कारमधून पाहिले. आपल्या गाडीतूनच त्यांनी या जोडप्याचा व्हिडीओ बनवला. शनिवारी ११ मे रोजी दुपारी कुंकारी येथे जात असताना त्यांना हे जोडपे राष्ट्रीय महामार्ग (NH)-43 वर स्टंट करताना दिसले. (Viral Video) यानंतर एसपी यांनी त्यांचा पाठलाग केला आणि व्हिडीओ बनवला. यावेळी तरुण हेल्मेट घालून बाईक चालवत होता. तर त्याची प्रेयसी बाईकच्या पेट्रोल टाकीवर बसली होती. स्टंट करताना त्यांनी एसपीची गाडी पाहिली आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, एसपीने त्यांचा पाठलाग केला, मोबाईलवर व्हिडीओ शूट केला आणि कारवाई देखील केली.

काय म्हणाले एसपी?

एका वृत्तानुसार या प्रकाराबाबत बोलताना एसपी शशी मोहन सिंग म्हणाले की, ‘आम्ही या जोडप्याला कुंकुरी ते जशपूरला जाताना एक धोकादायक स्टंट करताना पाहिले. यावेळी आम्ही त्यांना थांबवले आणि त्यांची चौकशी केली. त्यांनी आम्हाला सांगितले की ते मायली धरणाला भेट देण्यासाठी आले होते आणि यावेळी ते रोमँटिक स्टंट करताना दिसले. या प्रकाराबाबत आम्ही त्यांच्यावर कारवाई केली’.

(Viral Video) माहितीनुसार या बेजबाबदार जोडप्याला पोलिसांकडून ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. या जोडप्याच्या बेजबाबदार वागण्याबद्दल नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.