Viral Video : ‘काळ आला होता पण..’; काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघाताचा VIDEO व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर कायम विचित्र अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील बरेच व्हिडीओ अंगावर काटा आणणारे तर काही व्हिडीओ मन हेलावून टाकणारे असतात. एखाद्या अपघातात होणारी जीवितहानी कित्येक लोकांचं आयुष्य उध्वस्त करणारी असते. त्यामुळे असे व्हिडीओ पाहून हळहळ व्यक्त केली जाते. तर काही व्हिडिओंमध्ये नशीब नावाची गोष्ट खरोखर असते याचा चांगला प्रत्यय येतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर एक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाचा अपघात होताना दिसत आहे. मात्र केवळ आणि केवळ हेल्मेट घातल्यामुळे तो थोडक्यात बचावल्याचे आपण पाहू शकतो. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एका कारच्या खाली एक दुचाकी येते. या दुचाकीवरील चालक तरुण थेट कारच्या खाली येतो. हा अपघात पाहून आजूबाजूचे लोक धावून येतात आणि कार चालक जागीच थांबतो. (Viral Video) तेव्हा दुचाकीवरून पडलेला चालक तरुण कारखालून बाहेर येतो आणि बसतो.

नशीब बलवत्तर म्हणून गाडीखाली येऊनही चालक तरुणाला खरचटले देखील नाही. तो जीवंत आणि ठणठणीत असल्याचे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. गाडीखालून बाहेर येताच तो तरुण हाताने डोक्यावरील हेल्मेट काढतो आणि या हेल्मेटमुळेच त्याचा जीव वाचल्याचे समजते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. (Viral Video) सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट गरजेचे असूनही अनेक लोक विनाहेल्मेट प्रवास करतात. मात्र, हा व्हिडीओ पाहिल्यावर हेल्मेट घालण्याचे महत्त्व समजत आहे.

हा व्हिडीओ रांची शहरातला असल्याचे समजत आहे. सोशल मीडिया इंस्टाग्रामवर ranchi_jh777 नावाच्या हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हेल्मेट घाला’. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Viral Video) रस्त्यावर सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली ही घटना खरोखरच एक धडा आहे. त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी या घटनेवर कमेंट करताना हेल्मेट घालणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.