Viral Video : चाय नाय तर काय नाय!! 1 कप चहासाठी तरुणाचा गजब जुगाड; व्हिडीओ एकदा बघाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन।(Viral Video) चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच!! असं अनेकांच्या आयुष्याचं ब्रीदवाक्य असतं. जगभरात असंख्य चहाप्रेमी आहे. ज्यांची सकाळ चहासोबत आणि रात्रसुद्धा चहासोबतचं होते. त्यांच्या ‘टी टाईम’साठी सोबत ‘ती’ नसली तरी चालेल पण मस्त वाफाळणाऱ्या चहाचा घोट हवाचं. अशा लोकांसाठी चहा म्हणजे सर्वस्वचं जणू! त्यामुळे अशा एखाद्या चहा प्रेमीला चहाची तलफ आली आणि वेळेवर चहा मिळाला नाही तर तो काय करू शकतो? याचं प्रात्यक्षिक दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

कधीही, कुठेही, कसाही चहा पिणाऱ्या लोकांचं चहा प्रेम एक प्रकारचं वेड असतं हे या माणसाने सिद्ध केलाय. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एका व्यक्तीने घरात गॅस, स्टोव्ह नसताना एक कप चहासाठी केलेला जुगाड पाहून तुम्हीसुद्धा तोंडात बोटं घालाल. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होतो आहे. फक्कड चहासाठी या तरुणाने केलेला जुगाड फक्त अस्सल चहाप्रेमीचं करू शकतो. या व्हिडीओत आपण पाहू शकतो कि, एक काप चहा बनवण्यासाठी या तरुणाने एका सॉसपॅनमध्ये पाणी गरम करून त्यात चहा पावडर, साखर, दूध असे सर्व साहित्य टाकले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Apna Vidisha❤️ (@mera_vidisha)

(Viral Video)आता हा चहा उकळण्यासाठी त्याने चक्क वॉटर हीटिंग रॉडचा वापर केल्याचे आपण पाहू शकतो. ज्या हीटिंग रॉडचा वापर अंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी केला जातो, त्या रॉडच्या सहाय्याने या तरुणाने चक्क चहा बनवला आहे. या व्हिडिओत आपण पाहू शकतो कि, गॅसच्या फ्लेमवर जसा चहा उकळतो तसाच या इलेक्ट्रिक हीटिंग रॉडच्या मदतीने बनवलेला चहा उकळताना दिसतो आहे. बघता बघता काही मिनिटांतच इलेक्ट्रिक हीटिंग रॉडच्या मदतीने हा चहा तयार होताना दिसतोय.

हा व्हिडीओ सोशल मीडिया इंस्टाग्रामवर mera_vidisha नावाच्या हँडलवर शेअर करण्यात आला आहे. ज्यावर अनेक चहाप्रेमी आणि नेटकरी वेगवेगळ्या कमेंट करताना दिसत आहेत. यातील अनेक नेटकऱ्यांनी या चहाला नाव ठेवण्यात सोडलेली नाही. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलंय, ‘आपल्या भारतात किती टॅलेंटेड लोक आहेत यार’. (Viral Video) तर आणखी एकाने म्हटलंय, ‘हे असलं कुणीही काही करू नका. यामुळे एकतर वॉटर हीटिंग रॉड खराब होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची तब्येत सुद्धा खराब होऊ शकते’. तर काही नेटकऱ्यांनी मात्र असा जुगाड करून वापरून बनवलेल्या मॅगीची आठवण शेअर केली आहे.