Viral Video : ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे भीषण अपघात, गाडी घुसली थेट दुकानात; CCTV फुटेज आलं समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) गेल्या काही काळात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत. कधी मेट्रो तर कधी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी सुरु असलेल्या या कामामुळे दिवसेंदिवस ट्रॅफिक वाढत चालले आहे. दरम्यान अपघातांचे प्रमाण सुद्धा प्रचंड वाढले आहे. सोशल मीडियावर अनेक अपघातांचे थरारक व्हिडीओ व्हायरल सुद्धा होतात. यातील काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे तर काही दुसऱ्याच्या चुकीमुळे घडताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मिडीयावर व्हायरल होणारा हा अपघाताचा व्हिडीओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा येणे साहजिक आहे. या व्हिडिओत एका कारचालकाने चक्क एका चहाच्या दुकानात कार घुडवल्याचे चित्र दिसत आहे. हा अपघात अत्यंत भीषण स्वरूपाचा आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (Viral Video) मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात उल्हासनगरमध्ये घडला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक ३ येथील ईगल हॉटेलजवळ असलेल्या बालाजी टी हाऊस येथे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.

एक जण जखमी

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, एक लाल रंगाची चारचाकी गाडी या चहाच्या दुकानात घुसली आहे. दरम्यान, कारचालकाचे त्याच्या कारवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. (Viral Video) या अपघातात कारच्या पुढच्या भागाचा चांगलाच चुरा झाला झाल्याचे दिसत आहे. या अपघातानंतर दुकानात आणि दुकानाबाहेर उपस्थित लोकांची चांगलीच घाबरगुंडी झाली होती. दरम्यान, या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. घडलेल्या प्रकाराची चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सोशल मीडियावर कायम वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील बरेच व्हिडीओ अपघातांशी संबंधित असतात. ज्यामध्ये या घटनेचादेखील समावेश आहे. सोशल मीडिया X ट्विटर हॅण्डल ruchika नावाच्या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिला आहे. (Viral Video)