Viral Video : संतापजनक!! आधी घातला वाद नंतर लगावली कानशिलात; ट्रॅफिक पोलिसासोबत तरुणीचे गैरवर्तन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) रस्त्यावर गाडी चालवताना वाहतुकीच्या नियमाचे पालन करणे हे प्रत्येक वाहन चालकाला बंधनकारक असते. मात्र तरीही अनेक वाहनधारक या नियमांचे पालन करत नाहीत. म्हणूनच जागोजागी ट्रॅफिक पोलीस तैनात करण्यात आल्याचे दिसून येते. सिग्नलवर एखाद्याने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले तर हे पोलीस त्यांना दंड ठोठावू शकतात. तसा यांना अधिकार असतो. याशिवाय एखादी संशयास्पद परिस्थिती असेल तर वाहनांची झडती देखील घेण्याचा अधिकार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.

असे असूनही काही ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांसोबत गैरवर्तनाच्या, मारहाणीच्या घटना घडल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता पुन्हा एकदा अशाच एका ट्रॅफिक पोलिसासोबत गैरवर्तन करताना एका तरुणीचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जो पाहून अगदी तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) एक तरुणी ट्रॅफिक पोलिसासोबत गैवर्तन करताना दिसते आहे. हा व्हिडिओ पाहून आरोपींना पोलिसांचा धाक राहिलेला नाही, असेच काहीसे वाटत आहे. या तरुणीच्या गाडीला नंबर प्लेट नसल्यामुळे या पोलिसाने तिची गाडी थांबवली होती. मात्र आपली गाडी का थांबवली? म्हणून ही तरुणी संताप व्यक्त करू लागली. सुरुवातील या तरुणीने पोलिसासोबत वादावादी केली. यानंतर पोलीस आपलं ऐकत नाहीत हे समजले असता ती अक्षरशः त्यांच्या अंगावर धावून गेली. इतकंच काय तर त्यांना मारहाण करू लागली. यावेळी तिने पोलिसांच्या कानशिलात देखील लगावली.

या तरुणीची एकंदरच हिंमत पाहून कोणालाही पोलिसांच्या सुरक्षिततेबाबत काळजी वाटू शकते. (Viral Video) हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. इतकेच नव्हे तर या व्हिडिओवर अनेक नेटकरी विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. या प्रतिक्रियांत नेटकऱ्यांमध्ये उसळलेला संताप अगदी स्पष्ट दिसत आहे. सोशल मीडिया ट्विटर एक्स gharkekalesh नावाच्या अकाउंट वरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

(Viral Video)हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील कानपूर इथला असल्याचे या व्हिडिओसोबत नमूद करण्यात आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी या तरुणीच्या वर्तनाची निंदा केली आहे. एकाने कमेंट करत लिहिलंय, ‘या मुलीची हिंमत कशी झाली? हिला अटक व्हायला हवी’. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिलंय, ‘धन्य आहेस बाई तू.. कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर हात उचलून काय सिद्ध केलंस तुझं तुलाच माहित’.