Viral Video : अरेच्छा!! हा तर ट्रान्सपरंट गुलाब जाम; आगळ्या वेगळ्या स्वीट डिशचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) खवय्यांची खवय्येगिरी एखाद्या चवीवर किंवा एखाद्या पदार्थावर कधीच थांबत नाही. खाण्याचे शॉकीन कायम वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असतात. आजकाल तर अनेक फूड ब्लॉगर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे पदार्थ आणि त्यांच्या चवींविषयी बोलताना दिसतात. यासाठी ही मंडळी अनेक देश विदेश, राज्य, जिल्हे, शहर, गाव फिरत असतात. विविध चवीचे विविध पदार्थ वेगवेगळ्या भागात बनवले जातात. जस गाव तसं खाणं. काही भागात खूप तिखट खाल्लं जातं. तर काही भागांमध्ये खूप गोड खाल्लं जातं.

आता गोड खाण्याचा विषय निघालाच आहे तर मग गुलाब जामला विसरून कसं चालेल? अनेक लोकांचा लाडका गुलाब जाम खव्यापासून तर कधी रव्यापासून बनवलेला असतो. साखरेच्या सोनेरी पाकातील गुलाब जाम खायला इतका चविष्ट असतो की बस्स!! खातंच रहावा असं वाटतं. (Viral Video) आता खव्याचे, रव्याचे किंवा अगदी उरलेल्या पोळीचे सुद्धा गुलाब जाम तुम्ही खाल्ले असतील. पण ट्रान्सपरंट गुलाब जाम कधी खाल्लाय का? अगदी पाण्यासारखा पारदर्शक दिसणाऱ्या या गुलाबजामचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

आजपर्यंत तुम्ही अनेक स्वादिष्ट गुलाब जाम खाल्ले असतील. पण हा पारदर्शक गुलाब जाम नक्कीच चाखला नसेल. आजकाल सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. ज्यामध्ये विविध पदार्थांचे व्हिडीओ सुद्धा असतात. यांपैकी एक म्हणजे हा ट्रान्सपरंट गुलाबजाम. या गुलाब जामला एक आगळीवेगळी स्वीट डिश म्हणता येईल. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, एका प्लेटमध्ये पारदर्शक बर्फाचा गोळा फिरत आहे. या गोळ्याच्या वरील बाजूस एक छोटासा गुलाब जामसुद्धा दिसतोय.

हा ट्रान्सपरंट गुलाब जामचा व्हिडीओ सोशल मीडियावर फारच व्हायरल होतो आहे. अगदी बर्फासारखा दिसणारा हा पदार्थ स्वीट डिश आहे की फक्त आकर्षण वाढवण्यासाठी असं सर्व्ह केलं जातं, याबाबत काही पक्की माहिती देता येणार नाही. काही दिवसांपूर्वी हा व्हिडीओ बंगळुरूमधील एका स्वीट शॉपमधला असून प्रसिद्ध ब्लॉगर taste this bangalore ने सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. (Viral Video)