Viral Video : काहीपण!! हेअर कलर करण्यासाठी केला उजालाचा वापर; रिझल्ट बघून व्हाल अवाक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) केसांचे सौंदर्य आपल्याला चार चौघात लक्षवेधी बनवते. त्यामुळे अनेक लोक आपल्या केसांवर प्रचंड मेहनत घेतात. केस विंचरण्यापासून ते केस धुण्यासाठी वापरायचे शॅम्पू अशा प्रत्येक गोष्टीबाबत हे लोक सतर्क असतात. दरम्यान, आजकाल केसांना हायलाईट करण्याचा ट्रेंड सुरु आहे. लाल, पांढरा, जांभळा तर कधी सोनेरी रंग वापरून लोक हेअर हायलाईट करतात. दिसायला इतरांपेक्षा अत्यंत हटके असे त्यांचे लूक असतात. यासाठी वापरले जाणारे हेअर कलर केसांच्या आणि त्वचेच्या सुरक्षेचा विचार करून बनवलेले असतात. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय बोलावं तेच सुचणार नाही.

लहानपणी नव्वदीच्या दशकात ‘चार बूंदोवाला.. उजाला’ ही जाहिरात तुम्ही नक्कीच पाहिली असेल. ही जाहिरात कपड्यांच्या शुभ्रतेसाठी वापरल्या जाणाऱ्या नीळची होती. आतापर्यंत तुम्ही उजालाचा वापर हा बनियन किंवा रुमाल धुण्यासाठी केला असेल. पण कधी केसांना रंग देण्यासाठी उजाला नीलचा वापर केला आहे का? बरं नुसता विचार तरी केला आहे? नाही ना? पण या माणसाने नुसता विचार नव्हे तर प्रत्यक्षात कृती केली आहे. (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एका हेअर सलोनमध्ये आलेल्या ग्राहकाच्या केसांना रंग देण्यासाठी उजाला निळचा वापर केल्याचे दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण आपल्या केसांना कलर द्यायचा म्हणून एका सलूनमध्ये आलेला दिसतोय. या व्हिडिओत सलूनमध्ये काम करणारा कर्मचारी आपल्या ग्राहकाला खुर्चीत बसवतो. या तरुण ग्राहकाचे केस आधीपासूनच सोनेरी रंगाने रंगवलेले दिसत आहेत. (Viral Video) पण आता नवा रंग देण्यासाठी यांनी नवा जुगाड शोधून काढल्याचे या व्हिडिओत आपण पाहू शकतो. सलून कर्मचारी या ग्राहकाचे केस क्लिन्झर शॅम्पूने धुवून घेतो आणि त्यानंतर केसावर उजाला निळ लावतो. त्यानंतर केसांना स्वच्छ धुऊन घेतो आणि पुसून घेतो. यानंतर तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहू शकता की ग्राहकाच्या केसांना पांढरा आणि निळा असा कॉम्बिनेशन कलर आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

(Viral Video)सोशल मीडिया इंस्टाग्रामवर haireducation_rahul या हँडल वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, ‘उजाला निळ फक्त प्रयोगासाठी..’. सध्या हा सलूनमधील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. जो पाहून अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. तर काहींनी ट्रोलसुद्धा केले आहे.