Viral Video : Anaconda सोबत पोहण्याचं धाडस करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल; प्रसिद्धीसाठी धोक्यात टाकला जीव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आजकाल जो तो प्रयत्न करत आहे. त्यामुळे अचानक रील स्क्रोल करताना काय पहायला मिळेल याबद्दल काहीही सांगू शकत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये भांडण, जुगाड, अतरंगी चाळे, विचित्र घटना आणि प्राण्यांचे व त्यांच्यासोबतचे व्हिडीओ सर्वाधिक ट्रेण्डिंगमध्ये असतात. अनेक लोक वेगवेगळ्या प्राण्यांसोबत पक्ष्यासोबतचे व्हिडीओ बनवून शेअर करतात आणि प्रसिद्ध होतात.

दरम्यान, अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. आजपर्यंत तुम्ही कुत्रा, मांजर, पोपट, माकड, गाय, घोडा अशा प्राण्यांसोबतचे बरेच व्हिडीओ पाहिले असतील. पण हा व्हिडीओ पाहून तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. एका व्यक्तीने प्रसिद्ध होण्यासाठी चक्क अॅनाकोंडासारख्या भयानक सापासोबत व्हिडीओ केला आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर सापाचे बरेच व्हिडीओ व्हायरल होतात. पण हा अंगावर काटा आणणारा आहे. असं तर नुसतं सापाचं नाव ऐकून घाम फुटतो. त्यात अॅनाकोंडासारख्या सापाचा विषय असेल तर मग काय बघायलाच नको. अशातच सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी बनवण्यात आलेला हा व्हिडीओ पाहून कुणालाही भीती वाटू शकते. या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, एक व्यक्ती चक्क अॅनाकोंडाचे शूट करण्यासाठी पाण्यात उतरत आहे. सुरुवातीला तो ॲनाकोंडाला दाखवत आहे. त्यानंतर हळूहळू ॲनाकोंडाचे शरीर दाखवत आहे. यावेळी अनेकदा तो व्यक्ती शूट घेण्यासाठी ॲनाकोंडाच्या खूप जवळ जाताना दिसतोय.

हा व्हिडीओ ब्राझीलमधील पंतनाल वेटलँड या ठिकाणी शूट करण्यात आला असून तो इंस्टाग्रामवर safari.travel.idea या पेजवर शेअर केला गेलाय. (Viral Video) सोबत कॅप्शमध्ये लिहिलंय, ‘आम्ही ॲनाकोंडाचे असे शूट करण्याची शिफारस करत नाही. खरं तर, आम्ही मनुष्याला खाण्यास सक्षम असलेल्या कोणत्याही मोठ्या सरपटणाऱ्या प्राण्यांबरोबर पाण्यात उतरू नये असा सल्ला देऊ. पण, काही लोकांकडे ते सुरक्षितपणे करण्याचे कौशल्य असते.

या व्हिडीओद्वारे सांगायचंय की, पंतनाल हे खूप मोठ्या ॲनाकोंडाचे वास्तव्य असलेले ठिकाण आहे. त्यांना उष्णकटिबंधीय पाणथळ वस्ती आवडते आणि पंतनाल ही जगातील सर्वात मोठी उष्णकटिबंधीय आर्द्रभूमी आहे. त्यामुळे तुमच्यापैकी ज्यांना सापांची आवड आहे, तसेच ज्यांना जंगलात ॲनाकोंडा पाहायला आवडेल, त्यांना आम्ही पंतनालला भेट देण्याची शिफारस करतो’.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. (Viral Video) या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलंय, ‘याच नशीब चांगलं होत.. त्याच पोट आधीच भरलंय’. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिलंय, ‘याने ‘ॲनाकोंडासोबत पोहू नका..’ असा जो इशारा दिलाय तो मला फार आवडलाय… कारण मी उद्या तेच करण्याचा विचार करत होतो’. आणखी एका युजरने म्हटलं, ‘भाऊ तुझं नशीब जोरावर होतं की त्याने आधीच काहीतरी खाल्लंय, नायतर तुझं काय झालं असत?’