Viral Video : मस्तच!! तोंडाने वाद्यांचे आवाज काढून तरुणानं केलं सहप्रवाशांचं मनोरंजन; रेल्वेतील Video व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होणं आजकाल अगदी सोप्प झालं आहे. काहीतरी हटके आणि इतरांपेक्षा वेगळं केलं की चर्चा झाली म्हणून समजाचं!! कमी वेळात जास्तीत जास्त प्रसिद्ध होण्याचं सोप्प ठिकाण म्हणजे सोशल मीडिया. हल्ली सोशल मीडिया वर अनेक लोक स्वतःच्या कलाकुसरी सादर करून त्याचे व्हिडीओ बनवतात आणि शेअर करतात. यातले बरेच व्हिडीओ व्हायरल होतात. असाच एका जबरदस्त कलाकाराचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओतील तरुण तोंडाने वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज काढून सगळ्यांचे मनोरंजन करताना दिसतोय.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ ट्रेनमधला आहे. प्रवासादरम्यान स्वतःसोबत इतरांचा विरंगुळा व्हावा म्हणून एक तरुण आपल्या अनोख्या कलेचे सादरीकरण करताना दिसतो आहे. मुख्य म्हणजे ही कला काही अशी तशी नाही बरं का.. तोंडाने वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज काढून हा तरुण सर्वांचे लक्ष वेधून घेतो आहे. (Viral Video) जगभरात कलाकार मित्रांची काही कमी नाही आणि हा तरुण त्यांपैकी एक कलाकार आहे असे म्हटले काही चुकीचे वाटणार नाही. अगदी सेकंदात त्याने तोंडातून विविध वाद्यांचे हुबेहूब आवाज काढल्याचे यात पहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, हा तरुण कधी तोंडाने तर कधी नाक दाबून वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज काढतो आहे. व्हायोलिन, सितार, शहनाईसारख्या अवघड वाद्यांचे आवाज तो अगदी सहज काढतो आहे. जे पाहून आणि ऐकून रेल्वेच्या डब्यातील त्याचे सहप्रवासी मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत. (Viral Video) या तरुणाने काढलेला शहनाईचा आवाज ऐकून तर खरोखरच लग्न मंडपात असल्याचा भास होईल. या व्यक्तीची कला खरोखरच अद्भुत आणि कौतुक करण्याजोगी आहे.

हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया X हॅण्डल TechAndCricket नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ट्रेनमध्ये एक प्रवासी असा अवलिया भेटला तर कुणाचा प्रवास सुखद होणार नाही. या व्हिडिओत ट्रेनमध्ये उपस्थित असणारे प्रवासी कलाकार मित्राच्या कलेला चांगली दाद देत आहेत. तसेच सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर नेटकरीदेखील या तरुणाच्या कमाल कौशल्याची कमेंटच्या माध्यमातून प्रशंसा करताना दिसत आहेत.