Viral Video : राज्यभरात पावसाने थोडी उसंत घेतली होती मात्र मागच्या दोन दिवसांत पुण्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस बरसायला सुरुवात केली आहे. आता पुणे म्हंटल्यावर गोष्ट एवढी साधी सोपी असते का ? पुणेकरांचा स्वॅगच जरा हाय लेव्हल आहे. हे काही वेगळे सांगायला नको. मग पुणे पाट्या म्हणा किंवा पुणेकरांचा स्वभाव म्हणा येथे हटके काहीतरी बघायला मिळतच. पुणेकरांच्या अशाच हटके गोष्टीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्की हसू येईल. चला मग जाणून घेऊया काय (Viral Video) आहे व्हिडीओ ?
काय आहे व्हिडिओत ? (Viral Video)
या व्हिडिओमध्ये तीन तरुण एका दुचाकी वर बसलेले दिसत आहेत. शिवाय पुण्यात पावसाचा जोर असल्यामुळे सगळीकडे पाऊस पडतोय आणि अशा पावसातून वाचण्यासाठी या पुणेकरांनी एक अनोखा जुगाड शोधला असून मोठी छत्री डोक्यावर घेतली आहे. ही जी छत्री आहे ती साधीसुधी छत्री नाही तर ही टपऱ्यांसाठी वापरण्यात येते अशी छत्री आहे. जी एका दोघाला नाही तर चक्क सहा-सात जणांना या छत्रीमध्ये सामावू शकते. ही भली मोठी छत्री घेऊन हे तिघे तरुण एका बाईक वरून पावसापासून वाचण्यासाठी जात आहेत. हे तरुण ट्रिपल सीट प्रवास करीत आहेत जे कायद्यात बसत नाही आणि एवढी मोठाली छत्री घेऊन जात आहेत त्यामुळे त्यांचा पुढचा प्रवास कसा झाला असेल याबाबत प्रश्नचिन्हच आहे मात्र हा (Viral Video) व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून नेटकरी याची मजा घेत आहेत.
rutik_jagtap_2005 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. (Viral Video) व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये प्रॉपर पुणेकर असं लिहिला आहे. या व्हिडिओवर अनेक सोशल मीडिया युजर्सने कमेंट केल्या असून एका युजरने लिहिला आहे एम एच बाराचा नाद नाही करायचा. आणखी एका युजरने पुढे लिहिले आहे ‘पोलीस’ पुढे तुमचा पत्ता विचारत आहेत’ तर आणखी एका युजरनी हा व्हिडिओ आवडला असून हसण्याच्या इमोजीज शेअर केल्या आहेत.