Viral Video : ए बाईss आवर स्वात:ला ! मुंबई लोकलमध्ये तरुणीचा अश्लीलपणा, संतापले प्रवासी

viral video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video : सध्या सोशल मीडिया आणि त्यावरील आभासी जगात आपला ठसा उमटवण्यासाठी लोक ना ना तऱ्हा करताना दिसतात. सोशल मीडियावरचे काही व्हिडीओ तरी बघताना किळस येते. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करण्यासाठी तयार असतात. अशाच पद्धतीने सोशलवर रील बनवण्यासाठी एका तरुणीने कहरच केलाय. अगदी गर्दीने भरलेल्या मुंबई लोकलमध्ये हे तरुणी तोकडे कपडे घालून अश्लील हावभाव करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. व्हायरल होणारा हा व्हिडीओ कोणत्या स्थानकांमधला आहे हे अद्याप कळलेलं नाही.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मुंबई लोकल मध्ये एक तरुणी तोकडा स्कर्ट आणि सफेद शर्ट घालून लोकलच्या सीटवर अशा पद्धतीने बसली आहे की समोरच्या व्यक्तीला तिला पाहून मान वाळवाशी वाटेल. शिवाय तिचे हावभाव देखील अश्लील आहेत. कुणीतरी तिचे हे लोकलमध्ये रील शूट करीत आहे. तुम्ही जर हा व्हिडीओ नीट पहिला तर तुम्हला जाणवेल की एक आजोबा तरुणीचे सुरू असलेले अश्लील हावभाव पाहून दुसऱ्या ठिकाणच्या सीटवर जाऊन बसणे पसंत करतात.

शिवाय तरुणीचा खुलेआम सुरू असलेला अश्लीलपणा पाहून अनेक प्रवासी मान दुसरीकडे फिरवून बसतात. धक्कादायक बाब म्हणजे तरुणी ट्रेनमधून उतरल्यानंतरही अशाप्रकारे रील्स बनवतेय. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय मात्र नेटकऱ्यांच्या यावर संतापनाक प्रतिक्रिया येत असून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

हा व्हिडीओ @WokePandemic नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, प्रवाशांच्या मनोरंजनासाठी ट्रेनमध्ये पोल डान्स केल्याबद्दल भारतीय रेल्वेचे आभार, अमेरिकन लोकांनाही ही सुविधा परवडत नाही. कॅप्शन गमतीदार वाटत असली तरी व्हिडीओतील घटना संतापजनक आहे.