हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vivo S20 – Vivo ने त्यांचा नवीन स्मार्टफोन Vivo S20 फोन लाँच केला आहे. तुम्ही जर बाजारात दमदार फीचर्स आणि AI तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेला फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हि सुवर्णसंधी ठरणार आहे. कारण या फोनमध्ये तुम्हाला 50MP मुख्य कॅमेरासह 6500mAh आकर्षक बॅटरी मिळणार आहे. तसेच यामध्ये फ्लुइड AMOLED डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट आणि 5000 निट्स पीक ब्राइटनेस असल्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत उत्कृष्ट व्हिज्युअल अनुभव देतो , त्यामुळे ग्राहक त्याकडे जास्त आकर्षित होतात. तर चला या भन्नाट स्टायलिश डिझाइन, प्रीमियम बिल्ड आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या फोन बदल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Vivo S20 स्मार्टफोनचे फीचर्स –
डिस्प्ले – विवो S20 मध्ये 6.67 इंचाचा फ्लुइड AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 5000 निट्स पीक ब्राइटनेस सह येतो, त्यामुळे चांगल्या प्रकाशातही उत्कृष्ट व्हिज्युअल अनुभव मिळतो.
प्रोसेसिंग – या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जनरल 3 चिपसेट आहे, जो 8GB, 12GB आणि 16GB रॅम व्हेरिएंटसह उपलब्ध आहे. 256GB आणि 512GB स्टोरेज ऑप्शन्स दिले आहेत, पण यामध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट उपलब्ध नाही.
कॅमेरा सेटअप – विवो S20 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 8MP अल्ट्रावाइड लेन्स आहे. 50MP फ्रंट कॅमेरा 4K आणि 1080p व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.
बॅटरी – या फोनमध्ये 6500mAh ची मोठी बॅटरी आहे, जी 90W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच यामध्ये रिव्हर्स चार्जिंग फीचर देखील उपलब्ध आहे.
प्रीमियम फीचर्स – या स्मार्टफोनमध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप, प्रॉक्सिमिटी सेन्सर आणि कंपास आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 802.11, Bluetooth 5.4, NFC, Infrared पोर्ट आणि USB Type-C 2.0 (OTG सपोर्टसह) दिले आहेत.
ऑडिओ – विवो S20 मध्ये स्टीरिओ स्पीकर्स आहेत, पण 3.5mm हेडफोन जॅक उपलब्ध नाही.
किंमत –
विवो S20 (Vivo S20) हा स्मार्टफोन ग्राहकांना भारतात 27,000 रुपयांना उपलब्ध आहे, जो मिड-रेंज सेगमेंटमध्ये फोटोग्राफी, गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी उत्तम पर्याय ठरते. त्यामुळे ग्राहकांना जास्त फायदे मिळणार आहेत.