स्वस्तात मिळणार Vivo T3x 5G मोबाईल; कंपनीने घेतला मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे ग्राहक कमी किंमतीत चांगला फोन खरेदी करण्यास इच्छुक आहेत , त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. Vivo या कंपनीने आपल्या Vivo T3x 5G स्मार्टफोनच्या किमती कमी केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ग्राहकांना हा फोन फक्त 12,499 रुपयांना मिळणार आहे. तसेच कंपनीने या स्मार्टफोनच्या विविध व्हेरियंट्सवर 1,000 रुपयांची घट केली आहे. म्हणजेच आता ग्राहकांना फोन खरेदी करतांना विविध पर्याय उपलब्ध होणार असून , त्या फोनला द्यावी लागणारी रक्कम हि कमी असणार आहे. तर चला या फोनबद्दल अधिक माहिती जाणून घेउयात.

Vivo T3x 5G फीचर्स –

या फोनमध्ये 6.72 इंचाचा फुल एचडी 1080×2408 पिक्सल LCD डिस्प्ले आहे, जो 1000 निट्स पीक ब्राइटनेस आणि 120Hz रिफ्रेश रेटसह एक स्मूथ व्हिज्युअल अनुभव देतो. हा फोन Android 14 आधारित Funtouch OS 14 वर चालतो, जो वापरकर्त्याला उत्कृष्ट सॉफ्टवेअर अनुभव प्रदान करतो. 4nm Snapdragon 6 Gen 1 चिपसेट आणि 8GB रॅम 8GB वर्चुअल रॅम सपोर्ट सोबत हा फोन आधुनिक वापरासाठी तयार केला आहे. स्टोरेजसाठी 128GB ची इनबिल्ट क्षमता आहे, आणि मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत विस्तार करण्याचा पर्याय आहे. तसेच 6000mAh बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह हा फोन दीर्घकालीन वापरासाठी चांगला आहे. कॅमेऱ्या बदल सांगायचं झालं तर , 50MP प्रायमरी कॅमेरा आणि त्याला 2MP सेन्सरची जोड आहे, तसेच 8MP फ्रंट कॅमेरा सेल्फी प्रेमींना आकर्षित करतो. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि IP64 रेटिंगसह हा फोन धूळ आणि पाणीपासून संरक्षण मिळवतो. ब्लूटूथ, GPS, आणि Wi-Fi कनेक्टिव्हिटीसह Vivo T3x 5G एक चांगला पर्याय ठरतो.

नो-कॉस्ट ईएमआय पर्यायाचा लाभ –

Vivo T3x 5G स्मार्टफोन Vivo India ई-स्टोअर, Flipkart आणि रिटेल स्टोअर्सवरून खरेदी करता येईल. डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 1,500 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते. ग्राहकांना 4,167 रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआय पर्यायाचा लाभही घेता येईल.

फोनची किंमत –

Vivo T3x 5G च्या विविध व्हेरियंट्सची किंमत आता कमी करण्यात आली आहे. 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या फोनची नवीन किंमत 12,499 रुपये आहे. 6GB रॅम + 128GB स्टोरेजचा फोन 13,999 रुपयांत उपलब्ध होईल, तर 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 15,499 रुपये आहे. यापूर्वी, या स्मार्टफोनचे व्हेरियंट्स 13,499 रुपये, 14,999 रुपये आणि 16,499 रुपये यांमध्ये उपलब्ध होते. तसेच हा फोन ग्राहकांना तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.