Vivo T4x 5G: 50MP कॅमेऱ्यासह 6500mAh बॅटरीचा Vivo T4x 5G स्मार्टफोन ‘या’ तारखेला होणार लाँच

0
16
Vivo T4x 5G
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vivo T4x 5G – जे ग्राहक Vivo T4x 5G स्मार्टफोनच्या लाँचची वाट पाहत होते , आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. Vivo कडून Vivo T4x 5G स्मार्टफोनच्या लाँचची तारीख आणि फीचर्स जाहीर करण्यात आलेले आहेत. कंपनीने याआधी फोनची किंमत अन फीचर्स बदल माहिती सांगितली होती. या फोनमध्ये ग्राहकांना सर्वात मोठी बॅटरी , 50MP चा कॅमेरा असे अनेक दमदार फीचर्स दिले आहेत. तसेच या स्मार्टफोनची डिझाइन देखील मनाला भावेल अशी आहे. तर चला या स्मार्टफोनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Vivo T4x 5G स्मार्टफोनचे फीचर्स –

बॅटरी – 6500mAh ची मोठी बॅटरी
प्रोसेसर – MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर
कॅमेरा – ड्युअल रियर कॅमेरा सेटअप (50MP मुख्य कॅमेरा)
AI फीचर्स – AI Erase, AI फोटो एन्हांस, AI डॉक्युमेंट मोड
रंग – जांभळा आणि निळा

5 मार्च 2025 लाँच –

Vivo T4x 5G स्मार्टफोन 5 मार्च 2025 रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल. कंपनीने यासाठी प्रेस रिलीज जारी करून लाँचची अधिकृत माहिती दिली आहे. याला Flipkart, Vivo च्या ऑनलाइन स्टोअर आणि अन्य रिटेल स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

किंमत –

स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपये (अंदाजे) असू शकते, आणि 6GB RAM + 125GB स्टोरेज वेरिएंटमध्ये (Vivo T4x 5G) तो मिळू शकेल. तसेच, या स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळण्याची देखील शक्यता आहे.