हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vivo V50 Lite 4G – Vivo ने आपला नवीन स्मार्टफोन Vivo V50 Lite 4G लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6500mAh ची मोठी बॅटरी, 90W वायर्ड फास्ट चार्जिंग, आणि Qualcomm Snapdragon 685 चिपसेट सारखे अत्याधुनिक फीचर्स आहेत. Vivo V50 Lite 4G हा स्मार्टफोन 50MP कॅमेरा आणि 8GB RAM सह लाँच करण्यात आला आहे. चला तर या स्मार्टफोनच्या किंमती आणि फीचर्सबदल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Vivo V50 Lite 4G चे फीचर्स –
Vivo V50 Lite 4G स्मार्टफोनमध्ये 6.77 इंचाची Full HD+ (1080×2392 पिक्सल) 2.5D POLED डिस्प्ले आहे, जी 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट करते. या स्क्रीनमध्ये 1800 nits चा लोकल पीक ब्राइटनेस लेवल आहे. डिस्प्ले 94.2% स्क्रीन-टू-बॉडी रेशियोसह येतो आणि SGS Eye Comfort सर्टिफिकेशन देखील प्राप्त आहे. तसेच Qualcomm Snapdragon 685 प्रोसेसर दिले आहे. डिव्हाइसमध्ये 8GB RAM आणि 256GB इनबिल्ट स्टोरेज उपलब्ध आहे. यामध्ये 8GB पर्यंत वर्चुअल RAM सपोर्ट देखील आहे. स्मार्टफोन Android 15 आधारित FuntouchOS 15 ऑपरेटिंग सिस्टमसह येतो.
बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी –
Vivo V50 Lite 4G मध्ये 6500mAh ची बॅटरी आहे, जी 90W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. यामध्ये रिव्हर्स चार्जिंगचा सपोर्ट देखील आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये ड्युअल-बैंड Wi-Fi, 4G, NFC, GPS, OTG, ब्लूटूथ 5.0 आणि USB Type-C पोर्टसारखी वैशिष्ट्ये आहेत. फोनचे डायमेंशन्स 163.77×76.28×7.79 मिमी असून त्याचे वजन 196 ग्राम आहे.
कॅमेरा –
या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सल MX882 प्राइमरी रियर सेंसर आहे. याशिवाय 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. त्याचबरोबर Vivo V50 Lite 4G मध्ये ड्युअल स्टिरिओ स्पीकर्स, मिलिट्री-ग्रेड MIL-STD-810H ड्रॉप रेजिस्टन्स सर्टिफिकेशन आणि IP65 डस्ट आणि स्प्लॅश रेजिस्टंट बिल्ड यांसारखी विशेष वैशिष्ट्ये आहेत.
Vivo V50 Lite 4G ची किंमत –
Vivo V50 Lite 4G स्मार्टफोनच्या 8GB RAM आणि 256GB स्टोरेज वेरियंटची किंमत 18,999 TRY (जवळपास 45,000 रुपये) आहे. हा स्मार्टफोन Vivo Turkey च्या ई-स्टोरवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही हा फोन Titanium Black आणि Titanium Gold रंगात खरेदी करू शकता.