हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vivo V50 Lite 5G – Vivo ने काही निवडक ग्लोबल मार्केट्समध्ये त्याचा नवीन स्मार्टफोन, Vivo V50 Lite 5G लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स आहेत जे 4G वेरिएंटसारखेच आहेत. पण यामध्ये ठराविक बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे ग्राहकांचा अनुभव द्विगुणी होणार आहे. Vivo V50 Lite 5G मध्ये 6500mAh मोठी बॅटरी, MediaTek Dimensity 6300 चिपसेट आणि 50MP ड्युअल रियर कॅमेरा यासारखे आकर्षक फीचर्स आहेत. तर चला, या स्मार्टफोनचे फीचर्स अन किंमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
Vivo V50 Lite 5G चे फीचर्स –
Vivo V50 Lite 5G स्मार्टफोन एक आधुनिक डिव्हाइस आहे, ज्यामध्ये 6.77 इंचाचा FHD+ 2.5D POLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1800 निट्स पीक ब्राइटनेससह अत्युत्तम व्हिज्युअल अनुभव प्रदान करतो. या फोनमध्ये 12GB RAM आणि 512GB इनबिल्ट स्टोरेज आहे, तसेच हे Android 15 बेस्ड Funtouch OS 15 वर कार्यरत आहे. MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर फोनला जास्त कार्यक्षमता देतो. कॅमेरा हा, 50 मेगापिक्सलचा MX882 प्राइमरी रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे, जे उत्तम फोटो आणि व्हिडिओसाठी आदर्श आहेत. 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी उत्कृष्ट आहे. स्मार्टफोनमध्ये 6500mAh बॅटरी आहे, जी 90W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते.
Vivo V50 Lite 5G किंमत –
Vivo V50 Lite 5G स्मार्टफोनच्या 12GB RAM अन 512GB इनबिल्ट स्टोरेज वेरिएंटची किंमत 399 यूरो (सुमारे 37,200 रुपये) आहे. हा स्मार्टफोन स्पेनमधील कंपनीच्या अधिकृत ई-स्टोअरवर उपलब्ध आहे. याला Fantasy Purple, Phantom Black, Silk Green and Titanium Gold या रंगांमध्ये खरेदी करता येईल.