Vivo V50e: Vivo V50e स्मार्टफोन लाँच; पहा फीचर्स अन किंमत

_Vivo V50e
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vivo V50e – Vivo ने आपला नवीन स्मार्टफोन Vivo V50e भारतात लाँच केला आहे. या नव्या फोनमध्ये 50MP सेल्फी कॅमेरा, अल्ट्रा स्लिम क्वाड-कर्व्हड डिस्प्ले, आणि AI आधारित स्मार्ट फिचर्स देण्यात आले आहेत. 256GB पर्यंत स्टोरेज, 5600mAh ची दमदार बॅटरी आणि IP68/IP69 प्रमाणित वॉटरप्रूफ डिझाइनसह हा फोन बाजारात दाखल झाला आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तर चला या लाँच झालेल्या Vivo V50e स्मार्टफोनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Vivo V50e चे फीचर्स –

या स्मार्टफोनमध्ये 6.77 इंचांचा Full HD+ AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्टसह स्मूथ व्हिज्युअल्स प्रदान करतो. MediaTek Dimensity 7300 (4nm) प्रोसेसर आणि Mali-G615 MC2 GPU यांच्या जोरावर हे डिव्हाइस उत्कृष्ट मल्टीटास्किंग आणि गेमिंग अनुभव देते. Android 15 वर आधारित Funtouch OS 15 हे ऑपरेटिंग सिस्टम वापरकर्त्याला आधुनिक आणि सुलभ इंटरफेस उपलब्ध करून देते. 5600mAh क्षमतेची बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट यामुळे दीर्घकाळ वापरासाठी ऊर्जा पुरवठा सुनिश्चित होतो.

कॅमेरा सेटअप अन इतर वैशिष्ट्य –

IP68 व IP69 प्रमाणपत्रामुळे हे फोन धूळ व पाण्यापासून सुरक्षित राहतो. कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Sony IMX882 मुख्य सेन्सर (OIS) आणि 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स असून, सेल्फीसाठी 50MP AI ऑटोफोकस कॅमेरा आहे. स्टोरेजसाठी 8GB RAM सह 128GB व 256GB पर्याय उपलब्ध आहेत. स्टीरिओ स्पीकर्स, USB Type-C ऑडिओ, 5G, Wi-Fi 6, Bluetooth 5.4 यांसारखी प्रगत कनेक्टिविटी वैशिष्ट्ये यामध्ये दिली आहेत, जी वापरकर्त्यांचा अनुभव आणखी समृद्ध करतात.

आकर्षक ऑफर्स –

Vivo V50e हा स्मार्टफोन प्रीमियम फीचर्स, दमदार बॅटरी आणि स्मार्ट AI अनुभव देणाऱ्या ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरतो. ऑनलाईन खरेदीवर HDFC व SBI कार्ड वापरल्यास 10% इंस्टंट डिस्काउंट, तसेच जुना फोन एक्सचेंज केल्यास 10% एक्सचेंज बोनस मिळतो. याशिवाय 6 महिने नो-कॉस्ट EMI व रु 1499 किंमतीचे Vivo TWS Earbuds मोफत मिळतात. ऑफलाइन खरेदीवर विविध बँक कार्ड्सवर 10% सूट, V-Shield Screen Damage Protection Plan वर 40% पर्यंत सवलत आणि जिओच्या रु 1199 प्रीपेड प्लॅनसोबत 2 महिन्यांसाठी 10 OTT अ‍ॅप्सचे फ्री प्रीमियम सबस्क्रिप्शन मिळते. या सर्व आकर्षक ऑफर्समुळे Vivo V50e एक उत्कृष्ट स्मार्टफोन डील ठरते.

Vivo V50e ची किंमत –

8GB + 128GB – रु 28,999

8GB + 256GB – रु 30,999

हा फोनसाठी आजपासून प्री-ऑर्डर सुरू झाली आहे आणि विक्री 17 एप्रिलपासून सुरू होणार आहे. हा फोन अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, Vivo India च्या वेबसाइटवर आणि ऑफलाइन स्टोअर्सवर उपलब्ध आहे.