Vivo X200 Ultra: 50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरीसह Vivo X200 Ultra लाँच; पहा किंमत

Vivo X200 Ultra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vivo X200 Ultra – वीवोने आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Vivo X200 Ultra लाँच केला आहे. हा स्मार्टफोन प्रीमियम डिझाईन, पॉवरफुल हार्डवेअर अन Zeiss ब्रँडेड कॅमेरा सेटअपसह आला आहे. डिव्हाइसमध्ये 6.82 इंचाचा 2K LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120Hz रिफ्रेश रेट, 4500 निट्स पीक ब्राइटनेस आणि 93.3% स्क्रीन-टू-बॉडी रेशियोसह येतो. यामध्ये Qualcomm चा नविन Snapdragon 8 Elite चिपसेट वापरण्यात आला असून Android 15 आधारित FunTouch OS 15 वर फोन काम करतो . तर चला या फोनच्या फीचर्स अन किमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Vivo X200 Ultra चे फीचर्स –

फोटोग्राफीसाठी Vivo X200 Ultra मध्ये Zeiss-ब्रँडेड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP Sony LYT-818 प्राइमरी सेन्सर, 50MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 200MP Zeiss APO टेलिफोटो सेन्सरचा समावेश आहे. या कॅमेऱ्यांमुळे कंपनीने DSLR स्तराच्या फोटोग्राफीचा अनुभव मिळण्याचा दावा केला आहे. यासोबत एक खास Photography Kit देखील मिळते, ज्यात Zeiss 2.35x टेली-कन्व्हर्टर आणि 2300mAh इनबिल्ट बॅटरी असलेली कॅमेरा ग्रिप मिळते. सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.

बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी –

स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 90W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. डिव्हाइस IP68 आणि IP69 डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, Wi-Fi, Bluetooth 5.4, NFC, GPS, OTG आणि USB टाइप-C पोर्ट देण्यात आले आहेत. याशिवाय, विविध सेन्सर्स आणि 3D अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरचा सपोर्टही आहे.

किंमत

Vivo X200 Ultra ची किंमतही वेगवेगळ्या व्हेरिएंट्समध्ये ठेवण्यात आली आहे. 12GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 6,499 युआन (सुमारे 75,500 रु ), तर 16GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 6,999 युआन (सुमारे 84,000 रु ) इतकी आहे. 1TB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 7,999 युआन (92,000 रु ) मध्ये उपलब्ध आहे, आणि खास Photography Kit सह येणारा टॉप मॉडेल 9,699 युआन (1,13,000 रु ) मध्ये मिळतो. हा फोन काळ्या , लाल आणि सोनेरी टोन रंगांमध्ये उपलब्ध असून, त्याची विक्री 29 एप्रिलपासून सुरू होणार आहे.