Vivo Y19e: Vivo Y19e स्मार्टफोन भारतात लाँच; पहा फीचर्स अन किंमत

Vivo Y19e
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vivo Y19e – Vivo ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Vivo Y19e लाँच केला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे, ज्याची सुरुवातीची किंमत 7999 रुपये आहे. Vivo Y19e मध्ये 13MP डुअल AI रियर कॅमेरा सेटअप, 5500mAh ची दमदार बॅटरी आणि आकर्षक डिझाइनसह उपलब्ध झाला आहे . याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये अनेक AI फीचर्स देखील दिले आहेत. हे फोन मिलिटरी-ग्रेड शॉक रेसिस्टन्स प्रमाणपत्राने सर्टिफाइड आहे. तर चला या स्मार्टफोनबदल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Vivo Y19e चे फीचर्स –

Vivo Y19e एक स्टायलिश स्मार्टफोन आहे जो उत्कृष्ट फीचर्ससह येतो. यामध्ये 6.74 इंचाची LCD डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह शानदार व्हिज्युअल अनुभव देतो . कॅमेराच्या बाबतीत, Vivo Y19e मध्ये 13MP डुअल AI रियर कॅमेरा आहे, जो AI Erase आणि AI Enhance सारख्या आधुनिक फीचर्ससह उत्तम फोटोग्राफीची अनुभव प्रदान करतो. 5500mAh बॅटरीमुळे याला दीर्घकालीन बॅटरी आयुष्य मिळते, ज्यामुळे तुम्ही दिवसभर अडथळा न येता तुमचा फोन वापरू शकता. प्रोसेसरसाठी, यामध्ये Unisoc 17225 ऑक्टाकोर प्रोसेसर आहे, जो 4GB RAM आणि 4GB एक्सपेंडेबल RAM सह कार्यप्रदर्शन वाढवतो. 64GB इंटरनल स्टोरेज आणि 2TB पर्यंत माईक्रोएसडी कार्ड सपोर्टसह, तुम्हाला तुमचा सर्व डेटा आणि अ‍ॅप्स स्टोर करण्यासाठी भरपूर जागा मिळते. फोनची डिझाइनही आकर्षक असून त्याचे वजन 199 ग्राम आहे. यामध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि AI फोटो फीचर्स सारखे स्मार्ट फीचर्स देखील आहेत, जे वापरकर्ता अनुभव आणखी सुधारतात.

रंग आणि किंमत –

Vivo Y19e दोन आकर्षक रंगांच्या वेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे – Titanium Silver आणि Majestic Green. याची किंमत 7999 रुपये असून, हा स्मार्टफोन Flipkart, Vivo India ई-स्टोअर आणि पार्टनर रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध आहे. Vivo Y19e बरोबर Jio चा खास 499 रुपये प्रीपेड प्लॅन देखील उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूझर्सला 84GB डेटा (प्रति दिवस 3GB डेटा), अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 SMS मिळतील.