Vivo Y29 5G स्मार्टफोन भारतात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vivo ने आताच आपल्या Y-Series मध्ये नवीन Vivo Y29 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. तसेच हा फोन तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असल्यामुळे अनेक ग्राहक त्याकडे वळताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे हा फोन कमी किमतीत SGS आणि मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणा असलेला पहिला स्मार्टफोन म्हणून ओळखा जात आहे . हा फोन 5500mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, आणि 256GB स्टोरेजच्या वैशिष्ट्यासह उपलब्ध होणार आहे. तर चला या फोन बदल अधिक माहिती जाणून घेऊयात.

फोनची वैशिष्ट्ये –

Vivo Y29 5G हा एक उत्कृष्ट स्मार्टफोन असून, जो आकर्षक डिझाइन आणि प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्याची जाडी 8.1 मिमी असून वजन 198 ग्रॅम आहे, ज्यामुळे फोन हातात सहज धरता येतो. या फोनमध्ये 5500mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे, जी 44W फ्लॅश चार्ज सपोर्ट करते, त्यामुळे जलद चार्जिंगचा अनुभव मिळतो. रॅम आणि स्टोरेजच्या बाबतीत सांगायचं झालं तर , Vivo Y29 5G मध्ये 8GB पर्यंत इनबिल्ट रॅम आहे, आणि 8GB वर्चुअल रॅम सह, यासोबत 256GB पर्यंत स्टोरेज ऑप्शन उपलब्ध आहे.

मल्टीटास्किंग आदर्श –

मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसरच्या मदतीने हा फोन मल्टीटास्किंग, गेमिंग, आणि स्ट्रीमिंगसाठी आदर्श आहे. 120Hz रिफ्रेश रेटसह LCD डिस्प्ले आणि 1000 निट्स पीक ब्राइटनेस यामुळे स्क्रीनवरील चित्रे अत्यंत स्पष्ट आणि आकर्षक दिसतात. तसेच यामध्ये, 50MP चा प्रायमरी रिअर कॅमेरा AI नाईट मोडसह उत्कृष्ट फोटोग्राफी अनुभव प्रदान करतो, तर 8MP चा फ्रंट कॅमेरा सेल्फी प्रेमींसाठी एक उत्तम पर्याय आहे. यासोबतच, या स्मार्टफोनला IP64 रेटिंगसह डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्सची सुरक्षा देखील मिळालेली आहे, जी त्याच्या टिकाऊपणाचे संकेत देत असते.

किंमत –

Vivo Y29 5G च्या विविध वेरिएंट्सची किंमत आकर्षक आहे, ज्यामुळे तो अनेक ग्राहकांना बजेटमध्ये उपलब्ध होतो. तुम्हाला 4GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटचा फोन 13999 मध्ये, 6GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंट 16499 मध्ये, 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंट 16999 मध्ये आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंट 18999 मध्ये उपलब्ध आहे. याचसोबत एसबीआय, IDFC फर्स्ट बँक, Yes बँक, आणि बँक ऑफ बडोदा यांसारख्या प्रमुख बँकांच्या कार्डांवर 1500 पर्यंत कॅशबॅक मिळवता येतो. तसेच हा फोन ग्राहकांना काळ्या , निळ्या आणि सोनेरी रंगात उपलब्ध होणार आहे.