हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vivo Y39 5G – ज्या ग्राहकांना Vivo चा नवीन लाँच झालेला स्मार्टफोन हवा आहे, त्यांच्यासाठी हि सुवर्णसंधी ठरणार आहे. कारण Vivo ने भारतात आपल्या Y-सीरीजचा लेटेस्ट स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo Y39 5G कंपनीचा नवीन फोन असून यामध्ये 6500mAh ची मोठी बॅटरी, 256GB अंतर्गत स्टोरेज, IP54 रेटिंगसारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. विवो Y39 5G ला मिलिट्री-ग्रेड रेजिस्टन्स आणि SGS सर्टिफिकेशन मिळाले आहे, तसेच यामध्ये 6.68 इंच स्क्रीन आहे. त्यामुळे ग्राहकांना एक चांगला अन उत्तमदर्जाचा फोन खरेदी करता येणार आहे. चला तर मग या स्मार्टफोनचे फीचर्स अन किमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Vivo Y39 5G चे फीचर्स –
Vivo Y39 5G स्मार्टफोनमध्ये 6.68 इंच (720 x 1608 पिक्सल) LCD स्क्रीन आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120Hz आहे आणि 264ppi पिक्सल डेंसिटीसह येतो. या हॅंडसेटमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 प्रोसेसर आहे. यामध्ये 8GB RAM आणि 256GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे. रॅमला 8GB पर्यंत वर्चुअली एक्सटेंड करता येऊ शकते. डिव्हाइसमध्ये Android 15 आधारित Funtouch OS 15 दिले आहे. कंपनीने दोन Android अन तीन सुरक्षा अपडेट्स मिळतील अशी गॅरंटी दिली आहे. तसेच विवो Y39 5G स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 6500mAh ची मोठी बॅटरी आहे जी 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी डिव्हाइसमध्ये ड्यूल-सिम सपोर्ट, 5G, ब्लूटूथ 5.0, GPS, आणि ड्यूल बॅंड Wi-Fi सारखी वैशिष्ट्ये आहेत.
फोटोग्राफीसाठी खास –
फोटोग्राफीसाठी Vivo Y39 5G मध्ये 50 मेगापिक्सल Sony HD कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. यामध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये AI Night Mode, Dual View Video आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलायझेशन (EIS) सारखी फीचर्स आहेत. याचसोबत फोनमध्ये विविध AI फीचर्स उपलब्ध आहेत. विवोने सांगितले आहे की यामध्ये AI Photo Enhance आणि AI Erase सारखी फीचर्स आहेत.
Vivo Y39 5G किंमत –
Vivo Y39 5G च्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेज वेरियंटची किंमत रु 16,999 आहे. त्याचबरोबर 256GB स्टोरेज वेरियंटची किंमत रु 18,999 आहे. हा स्मार्टफोन लोटस पर्पल आणि ओशन ब्लू (जांभळा आणि निळा) रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन ऐमझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, विवो इंडिया ई-स्टोर आणि सर्व पार्टनर रिटेल स्टोअर्सवरून खरेदी करता येईल. तसेच ग्राहक 6 एप्रिल 2025 पर्यंत विवो Y39 5G स्मार्टफोन खरेदी करताना 1500 रुपये कॅशबॅक मिळवू शकतात.