Wallace Line : समुद्राला दोन भागात विभागणारी अदृश्य सीमारेषा; मासेसुद्धा करत नाहीत ओलांडण्याची हिंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Wallace Line) हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ रामायण अत्यंत पूजनीय आहे. रामायण न केवळ ग्रंथातून तर नाटक, टीव्ही मालिका आणि अगदी चित्रपटांच्या माध्यमातून कायम पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवले जात आहे. या रामायणात लक्ष्मणरेखेचा उल्लेख आहे, ज्याविषयी आपण सगळेच जाणतो. जेव्हा प्रभू श्री राम पत्नी सीता आणि बंधू लक्षणासह वनवासाला गेले होते तेव्हा माता सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्मणाने ही लक्ष्मणरेखा आखली होती. मात्र, रावणाच्या मायाजाळात अडकून भावनेच्या भरात माता सीतेने ही लक्ष्मणरेखा ओलांडली आणि त्यापुढे जे घडलं ते रामायण होत.

अशीच पृथ्वीतलावर देखील एक अदृश्य सीमा आहे. जी डोळ्यांना दिसत नसली तरीही तिच्या अस्तित्वामुळे समुद्राचे दोन भाग झाले आहेत. (Wallace Line) या सीमेचे वैशिट्य म्हणजे, समुद्राचे विभाजन झाल्यानंतर या भागातील मासे वा कोणतेही समुद्री जीव दुसऱ्या भागात जाण्याची हिंमत करत नाहीत. होय. हे अत्यंत चमत्कारिक असून ही सीमारेषा न केवळ समुद्र तर एक अख्खा देशसुद्धा दोन भागात विभागते. चला तर जाणून घेऊया ही अभ्येद्य अदृश्य रेषा आहे तरी कुठे?

कुठे आहे?

आपण ज्या चमत्कारिक सीमारेषेविषयी बोलत आहोत ती इंडोनेशियाच्या दोन बेटांमध्ये बनलेली आहे. डोळ्यांना न दिसणाऱ्या या सीमारेषेचे नाव ‘वालेस लाइन’ (Wallace Line) असे असून इंडोनेशिया बाली आणि लोम्बोकमध्ये ही रेषा बनलेली आहे. सुमारे ३५ किलोमीटर लांब ही रेषा समुद्राचे आणि त्यासोबत इंडोनेशियाच्या दोन भागात विभाजन करते. ही सीमारेषा अदृश्य असल्यामुळे दिसत नाही. मात्र, तिचे अस्तित्व जाणवते. या रेषेमुळे समुद्राचे दोन भाग झाले आहेत आणि या दोन्ही भागांमध्ये विविध प्रजातीचे मासे, प्राणी तसेच पक्षी विहार करतात. जे एकमेकांची सीमारेषा ओलांडत नाहीत.

‘वालेस लाइन’ एक अदृष्य सीमारेषा (Wallace Line)

इंडोनेशियाला दोन भागांमध्ये विभागणारी वालेस लाइन ही एक अदृश्य सीमारेषा आहे. जिच्यामुळे मलय द्वीपसमूह आणि इंडो- ऑस्ट्रेलियाई द्वीपसमूह असे पृथ्वीवरील सर्वात मोठे द्वीपसमूह तयार झाले आहे. याची पश्चिमेकडील जीवसृष्टी आशियाई असून इथे हत्ती, वाघ, गेंडा आणि वुडपेकरसारखे पक्षी विहार करतात. तर दुसऱ्या बाजूला मात्र यापैकी प्रजातीचा एकही प्राणी दिसत नाही. अशा दोन्ही भागात वेगवेगळ्या प्रजातीचे प्राणी तसेच पक्षी विहार करत आहेत. एकंदरच दोन्ही बाजूचे जीवसृष्टी पर्यावरण भिन्न असल्याचे समजते.

वालेस लाइनचा इतिहास

वालेस लाइन ही अदृष्य सीमारेषा वैज्ञानिक भाषेत biogeographic boundary म्हणून ओळखली जाते. डोळ्यांना दिसत नसली तरीही दोन्ही भागांमधील पर्यावर सृष्टीची भिन्नता तिचे अस्तित्व अधोरेखीत करते. (Wallace Line) माहितीनुसार, चार्ल्स डार्विनच्या Theory of Evolution चा सिद्धांत स्वतंत्रपणे मांडणाऱ्या ब्रिटीश निसर्गशास्त्रज्ञ अल्फ्रेड रसेल वॉलेस यांनी १८५९ मध्ये ही अदृश्य सीमारेषा शोधली होती. मलय द्वीपसमूहात प्रवास करत्यावेळी त्याला इतर बेटांना भेट देताना या सीमारेषेचे अस्तित्व जाणवले.

पूर्वी बालीचा परिसर आशियाचा आणि लोंबकचा परिसर ऑस्ट्रेलियाचा भाग होता. मात्र, काही अभ्यासातून हे सांगितले जाते की, १९६० मध्ये ऑस्ट्रेलियन प्लेट टेक्टोनिक्स दक्षिणेकडील अंटार्क्टिकापासून दूर गेली. तेव्हा ही प्लेट हळूहळू उत्तरेकडे सरकली आणि यामुळे वॉलेस लाईन तयार झाली होती. (Wallace Line) यामुळे ही अदृश्य रेषा जिथे समुद्र विभागते तिथे दोन्ही भागामध्ये जैवविविधता आणि परिवाराण सृष्टीतील फरक दिसून येतो.