Washing Tips : आपण नेहमी चांगले कपडे घेतो. मात्र धुतल्यानंतर बऱ्याच कपड्यांचा रंग जातो. त्यानंतर असे कपडे पुन्हा नव्यासारखे दिसत नाहीत. जीन्स पुरुष आणि महिला दोघेही वापरतात. वेगवेगळ्या फंकी जीन्स घालणे सध्याचा ट्रेंड आहे. मात्र नवी जीन्स धुतल्यानंतर (Washing Tips) बऱ्याचदा त्याचा रंग जातो शिवाय विकत घेताना जो त्या जीन्स चा सॉफ्टनेस असतो तो देखील धुतल्यावर निघून जातो. म्हणूनच जीन्स धुण्याच्या अशा काही टिप्स आज आम्ही आजच्या लेखात सांगणार आहोत जेणेकरून जीन्सचा रंगही जाणार नाही आणि त्याचा मऊपणा सुद्धा कमी होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया या टिप्स ..
आजच्या लेखात आम्ही जीन्सचा रंग टिकून राहण्यासाठी अशी एक ट्रिक (Washing Tips) सांगणार आहोत . ज्यामुळे तुमच्या जीन्सचा रंग टिकुन राहिल . तर प्रत्येकाच्या घरात व्हिनेगर असतेच. व्हिनेगर एक प्रकारचे रसायन आहे. त्याचा उपयोग केवळ जेवणात नाही तर जीन्स चा रंग टिकवण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. हि ट्रिक वापरण्यासाठी तुम्हाला एक बदली थंड पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये एक कप व्हिनेगर (Washing Tips) घालायचे आहे. या द्रावणात १५-२० मिनिट जीन्स बुडवून ठेवा. नंतर जीन्स पाण्यातून काढून हँगरला लाटकवून ठेऊन वाळत घाला. असे केल्यास जीन्सचा रंग उडत नाही तसेच त्याचा मऊपणा सुद्धा टिकून राहतो.
जीन्स धुताना या गोष्टींची काळजी आवश्य घ्या (Washing Tips)
- जीन्स धुताना गरम पाण्याचा वापर करू नका यामुळे रंग फेड होतो.
- जीन्स धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा.
- जीन्स इतर कपड्यांसोबत भिजवू नका जीन्स वेगळी (Washing Tips) भिजवा.