Viral Video : नात्यास नाव आपुल्याss!! पुण्यातील वृद्ध जोडप्याचा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही प्रेमात पडाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) नुकताच १४ फेब्रुवारी रोजी दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला गेला. अनेक प्रेमी युगलांनी आपल्या पार्टनरसोबत हा दिवस अत्यंत प्रेमाने साजरा केला. काहींनी मनातील भावना व्यक्त करून नव्या आयुष्याची सुरुवात केली. तर काहींच्या नात्याला नवी पालवी फुटली. असा हा प्रेमाचा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवसाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, एका वृद्ध जोडप्याचा देखील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून कदाचित तुम्ही पुन्हा प्रेमात पडाल.

हा व्हिडीओ पुण्यातील एका वृद्ध जोडप्याचा आहे. ज्यामध्ये हे वृद्ध जोडपे निवांत बसलेले दिसत आहे. त्यांच्या नात्यातील ओढ आणि एकमेकांप्रती असलेलं प्रेम पाहून साहजिक आहे तुम्हीही पुन्हा एकदा प्रेमात पडाल. (Viral Video) एकीकडे दिवसेंदिवस प्रेमाची व्याख्या बदलत असताना दुसरीकडे या आजी- आजोबांचा व्हिडीओ पाहून जगात अजूनही निर्मळ प्रेम शिल्लक आहे, याची जाणीव होते. आता गुडघ्यावर बसून प्रपोज करणे, महागडे गिफ्ट्स देणे आणि प्रेम व्यक्त करणे असा काहीसा ट्रेंड आहे.

मात्र याबाबतीत पूर्वीच्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, त्यांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत काही वेगळीचं होती. अबोल तरीही बोलकी त्यांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आज पहायला मिळत नाही. एक गजरा किंवा फुलाच्या माध्यमातून ते कोणत्याही शब्दांशिवाय नात्याला सुरुवात करायचे. (Viral Video) अशीच मधाळ प्रेमाची गोष्ट या व्हायरल व्हिडीओतील जोडप्याची असेल असे पाहून वाटते. हा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील मनपा नजीकच्या छत्रपती शिवाजी महाराज पूलावरील आहे.

(Viral Video)या व्हिडीओत एक वृद्ध जोडपे कट्ट्यावर बसून निवांत गप्पा मारताना दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य अत्यंत निरागस आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला ‘क्या यही प्यार है’ हे सुंदर गीत लावले आहे. खरं प्रेम आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सावलीसारखं सोबत असतं म्हणतात ते कदाचित हेच!! rohanpawar.1812 या इंस्टाग्राम हॅण्डलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यहात आला आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलंय, ‘निरागस हास्य जगण्याचा अर्थ सांगून जाते’ तर दुसऱ्याने म्हटले, ‘मला माझ्या आई बाबाची आठवण आली पाहून… किती निरागस प्रेम आहे’.