Watermelon Seeds : कलिंगडाच्या बियांचे सेवन शरीरासाठी चांगले का वाईट? जाणून घ्या मगच खा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Watermelon Seeds) उन्हाळ्याच्या दिवसात लिंबानंतर सर्वाधिक खाल्लं जाणारं फळ म्हणजे कलिंगड. कलिंगड हे पाणीदार फळ खाल्ल्याने शरीराला आतून थंडावा मिळतो. शिवाय शरीर हायड्रेट राहण्यासाठी मदत होते आणि त्वचा देखील तुकतुकीत राहते. त्यामुळे अनेक लोक उन्हाळ्याच्या दिवसात हे फळ मोठ्या आवडीने खातात. कलिंगड खातेवेळी बिया तोंडात येतात आणि त्यामुळे बरेच लोक हे फळ खाणे टाळतात. तर काही लोक आधी बिया काढून घेतात मगच खातात. इतकंच काय तर कितीतरी लोक कमी बिया असलेलं कलिंगड द्या अशीही मागणी करतात. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, कलिंगडाच्या बिया खाणे शरीरासाठी चांगले असते. ते कसे? जाणून घेऊया.

कलिंगड बियांसकट खाणे शरीरासाठी चांगले (Watermelon Seeds)

अनेक लोक सांगतात की, कलिंगडाच्या बिया खाल्ल्याने आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते. पण मुळात असे काहीही नाहीये. जर तुम्ही कलिंगडाच्या बिया खाल्लात तर तुमच्या आरोग्याला कोणताही धोका नाही. या बिया पांढऱ्या असोत वा काळ्या. त्या खाणे सुरक्षित आहे, असे तज्ञ सांगतात. अनेक फळांच्या बियांमध्ये अत्यंत पोषक सत्व असतात. यामध्ये सब्जाचे बीज, सूर्यफुलाच्या बिया यांप्रमाणे कलिंगडाच्या बियांचा देखील समावेश आहे. आता कलिंगडाच्या बिया आरोग्यासाठी कशा फायदेशीर ठरतात? ते जाणून घेऊ.

कलिंगडाच्या बिया खाण्याचे फायदे

1. रोगप्रतिकारक शक्ती वाढते

आपल्या शरीराला रोगांपासून संरक्षण देणारी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे गरजेचे असते. (Watermelon Seeds) ज्यासाठी लागणारे झिंक कलिंगडाच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात असते. तसेच कलिंगडात आढळणारे जस्त हे कोणतेही संक्रमण आणि कोणत्याही विकाराशी लढण्यास मदत करते. इतकेच नव्हे तर, रोग प्रतिकारक पेशीदेखील तयार करतात.

2. हृदयाच्या आरोग्याचे रक्षण

कलिंगडाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि परिणामी हृदयाचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत होते.

3. पोटाच्या समस्या दूर राहतात

कलिंगडाच्या बियांमध्ये फायबर आणि अनसॅच्युरेटड फॅट्स आढळतात. (Watermelon Seeds) जे खाल्लेले अन्न पचन होण्यासाठी मदत करतात. तसेच हे घटक आतड्यांना निरोगी ठेवतात. त्यामुळे पोटाच्या समस्या होत नाहीत.

4. हाडांचे आरोग्य सुधारते

कलिंगडात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. जे आपली हाडे मजबूत आणि निरोगी राखण्यास मदत करते. हाडांच्या आरोग्याव्यतिरिक्त, ते स्नायूंच्या मजबुतीसाठी आणि योग्य मज्जातंतू प्रणालीसाठी देखील मदत करते.

5. त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

कलिंगडातील प्रथिने आणि फॅटी ऍसिड त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. (Watermelon Seeds) त्यामुळे फेस मास्क आणि हेअर मास्कमध्ये कलिंगडाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामुळे मुरुमांपासून बचाव होण्यास मदत मिळते.