Weather Update : होलिकादहनानंतरही हवामानाचा लहरीपणा संपायचं नाव घेत नाहीये. देशभरात कुठे थंडीचा कडाका तर कुठे तापमान 40 अंशांच्या पुढे गेलेलं पाहायला मिळत आहे. पश्चिमी झंझावाताचा प्रभाव अजूनही कायम असल्याने पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये अवकाळी पाऊस झाला. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होताना दिसतोय.
राज्यात कुठे पडणार पाऊस? (Weather Update)
महाराष्ट्रातील अनेक भागांत उन्हाचा तडाखा कायम असला, तरी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र मधील जळगाव, धुळे, नंदूरबार , मराठवाडा मधील छत्रपती संभाजीनगर तर विदर्भ मधील चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, यवतमाळ याठिकाणी वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किमी इतका असू शकतो, त्यामुळे हवामान आणखी बदलेल.
विदर्भात उन्हाचा कडाका कायम (Weather Update)
विदर्भात मात्र उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली आहे. विशेषतः सोलापूर आणि विदर्भात पारा 40 अंशांच्या पुढे गेलाय. उष्णतेमुळे बाष्पीभवन (Evaporation) वाढल्याने दमट हवामान निर्माण होत आहे. त्यामुळे एका बाजूला उन्हाचा कडाका तर दुसऱ्या बाजूला अचानक पावसाचे ढग दिसण्याची शक्यता आहे.
मुंबईत उकाडा वाढणार
पुढील 24 तासांमध्ये मुंबईत वातावरण (Weather Update) कोरडं राहील. किमान तापमान: 26 ते 27 अंश कमाल तापमान: 36 अंश राहण्याची शक्यता आहे.यामुळे मुंबईकरांना अजून काही दिवस उष्णतेच्या कडाक्यातच राहावं लागणार आहे.
काय घ्यावं काळजी? (Weather Update)
उन्हापासून बचाव करण्यासाठी पाणी जास्त प्यावं, हलका आहार घ्यावा आणि शक्यतो उन्हात जाऊ नये.
वाऱ्याचा वेग वाढल्यास सुरक्षित ठिकाणी थांबावं.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी पीक सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.