Weather Update : महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं संकट ! 8 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update : मागच्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात लहरी हवामानाचा अनुभव येतो आहे. त्यातच आत हवामानातील चक्रीवादळाच्या संकेतामुळे संकट ओढावले आहे. उष्णतेने धगधगलेला दिवस आणि रात्री गारवा निर्माण करणारा वातावरण, या दुहेरी संकटाने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना सुद्धा तणावात आणले आहे. विशेषत: आंबा, काजू, संत्री आणि द्राक्ष या फळांच्या बागांवर होणारे नुकसान (Weather Update) शेतकऱ्यांना मोठं धक्का देत आहे.

8 जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी (Weather Update)

दक्षिणेकडून कमी दाबाचा पट्टा तयार होऊन तो चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाच्या रूपात होईल, ज्यामुळे वातावरणात सतत होणारे बदल नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत आहेत. हवामान विभागाने 8 जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे, ज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा समावेश आहे.

तासांला तासाला तापमानात वाढ होणं आणि संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यांचा फटका यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये (Weather Update) महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. 29 आणि 30 मार्च रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली मध्ये पावसाचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होईल.

दरम्यान, उष्णतेचा कहर पुढील काही दिवसांमध्ये वाढू शकतो, ज्यामुळे (Weather Update) नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा प्रभाव पडू शकतो.