Weird Traditions : भारतातील ‘या’ गावात 5 दिवस कपडे न घालता फिरतात महिला; विचित्र आहे पण खरंय!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Weird Traditions) भारताची प्राचीन संस्कृती, इथल्या परंपरा, रीती- भाती, खाद्य संस्कृती, आयुर्वेदिक वनस्पती आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांचा भव्य इतिहास आहे. आपला देश हा वैविध्यतेने नटलेला असून आजही अनेक ठिकाणी या परंपरांचे तंतोतंत पालन केले जाते. यातील काही परंपरा या अत्यंत विचित्र असल्या तरीही त्या त्या भागातील मान्यतेमुळे आजही पाळल्या जात आहेत. जगभरात अनेक पर्यटन स्थळे, वास्तू आणि ठिकाणे आहेत. जिथे कपड्यांशिवाय किंवा तोकड्या कपड्यांमध्ये फिरण्याची परवानगी नाही. मात्र तुम्ही ऐकून हैराण व्हाल कि आपल्या देशात एक असे ठिकाण आहे जिथे तब्बल ५ दिवस महिला कपड्यांशिवाय फिरतात.

कुठे आहे असे ठिकाण..? (Weird Traditions)

भारतात हिमाचल प्रदेशातील मणिकर्ण खोऱ्यातील पिणी गावात ही परंपरा गेली अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या सुरु आहे. या ठिकाणी अजून अशा अनेक परंपरा सुरु आहेत ज्यांच्याविषयी आपण अनभिज्ञ आहोत. इथल्या या विचित्र परंपरेनुसार, श्रावण महिन्यातील ५ दिवस या गावात कोणतीही स्त्री कपडे परिधान करत नाही. प्रत्येक वर्षातील १७ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या ५ दिवसांत या प्रथेचे पालन केले जाते. गावातील अनेक महिला स्वेच्छेने हि प्रथा पाळतात. तर कित्येक महिला घरातून बाहेर पडणेसुद्धा टाळतात.

हि परंपरा पाळण्यामागील कारण काय..?

मुख्य म्हणजे, हि ५ दिवसांची परंपरा केवळ विवाहित स्त्रियांसाठी आहे. शिवाय या ५ दिवसांत महिलांनी पूर्ण निर्वस्त्र राहून आपल्या पतीसोबत कोणत्याही प्रकारचे संभाषण करायचे नसते. इतकेच नव्हे तर दोघांनी वेगवेगळे राहणे बंधनकारक आहे. येथील ग्रामस्थांच्या म्हणण्याप्रमाणे, या गावातील एखाद्या विवाहित स्त्रीने जर हि प्रथा पाळली नाही किंवा या परंपरेला नकार देऊन एखादा कपडा परिधान केला तर देव नाराज होतात. ज्यामुळे त्या स्त्रीला वाईट समाचार मिळतो किंवा एखादी वाईट घटना घडते. या भीतीमुळे आजही इथल्या स्त्रिया हि परंपरा (Weird Traditions) पाळणे बंधनकारक समजतात.

‘अशी’ आहे या परंपरेमागील आख्यायिका

गावकऱ्यांच्या मान्यतेनुसार, ‘फार पूर्वी पिणी गावात क्रूर राक्षसांची मोठी दहशत होती. या राक्षसांनी अक्षरशः थैमान घातले होते. त्यावेळी गावातील सुंदर कपडे परिधान करणाऱ्या विवाहित स्त्रियांना हे राक्षस उचलून नेत असत. अशावेळी ‘लहुआ घोंड’ नावाची देवता पिणी गावात प्रकटली आणि तिने सर्व राक्षसांचा वध करून गावाला व गावकऱ्यांना राक्षसांच्या जाचापासून सोडविले. तेव्हापासूनच पिणी गावात ५ दिवस महिलांनी कपडे न घालण्याची परंपरा सुरू झाली. (Weird Traditions) असे म्हणतात कि, या दिवसांत गावातील कोणत्याही स्त्रीने सुंदर कपडे परिधान केले तर आजही राक्षस तिला उचलून घेऊन जाऊ शकतात’. गावकरी सांगतात कि, आजही गावात ‘लहुआ घोंड’ देवता येते आणि वाईट शक्तींचा प्रभाव करते.