Brain Stroke : ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Brain Stroke) रोजची दगदग आणि धावपळीच्या आयुष्यात आपण कुठे ना कुठे आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला विसरतो. दरम्यान वरवर निरोगी वाटणार शरीर आतून मात्र विविध आजरांशी लढा देत असतं. अनेक आजार असे आहेत जे आपल्या वाढत्या वयासोबत वाढत असतात. मात्र वेळेवर शारीरिक तपासणी न केल्याने अशा आजरांची आपल्याला माहिती होत नाही. ज्याचे भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतात.

अशाच एका आजराविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. तो म्हणजे ‘ब्रेन स्ट्रोक’. अनेकदा ऐकण्यात, वाचण्यात आलेला हा आजार नक्की काय आहे? त्याची लक्षण काय? आणि त्यावर कोणते उपचार करावे? याविषयी आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत.

ब्रेन स्ट्रोक म्हणजे नेमकं काय? (Brain Stroke)

ब्रेक स्ट्रोक म्हणजे, एखाद्या कारणामुळे मेंदूमध्ये रक्ताचा पुरवठा थांबतो किंवा अचानक मेंदूत रक्तस्राव होऊ लागतो. ज्यामुळे माणूस अस्थिर होतो. ब्रेन स्ट्रोक झाल्याने मेंदूला इजा होऊ शकते. इतकेच नव्हे तर ब्रेन डेडची स्थिती निर्माण होते. याशिवाय मेंदूला तात्पुरती इजा, दीर्घकालीन अपंगत्व, पक्षाघात किंवा रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो.

ब्रेन स्ट्रोकचे दोन प्रकार असतात. ज्यामध्ये इस्केमिक स्ट्रोक आणि हॅमरेजिक स्ट्रोक यांचा समावेश आहे.

  1. इस्केमिक स्ट्रोक – (Brain Stroke) रक्त मेंदूपर्यंत न पोहचल्याने मेंदूला रक्ताद्वारे ऑक्सिजन आणि पोषक तत्वं मिळत नाहीत. अशावेळी मेंदूमध्ये होणारा रक्तप्रवाह खंडीत झाल्याने होणाऱ्या स्ट्रोकला ‘इस्केमिक स्ट्रोक’ असे म्हटले जाते.
  2. हॅमरेजिक स्ट्रोक – रक्तस्त्राव झालेले रक्त मेंदूच्या पेशींवर खूप जास्त दबाव निर्माण करते. ज्यामुळे पेशींचे नुकसान होते. अशावेळी मेंदूतील एका रक्तवाहिनीतून रक्तस्त्राव होऊ लागतो, तेव्हा निर्माण होणाऱ्या परिस्थितीला ‘हॅमरेजिक स्ट्रोक’ असे म्हणतात.

ब्रेन स्ट्रोकची लक्षणे

  1. ब्रेक स्ट्रोक झाल्यास रुग्ण अस्थिर होतो आणि त्याला चक्कर येऊ लागते. (Brain Stroke)
  2. ब्रेन स्ट्रोकने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला हात, चेहरा आणि पायात सुन्नपणा तसेच अशक्तपणा जाणवतो.
  3. ब्रेन स्ट्रोक झाल्यास दोन्ही डोळ्यांनी पाहण्यात अडचण येते. डोळ्यासमोरील दृश्य हलू लागतात.
  4. स्ट्रोक आल्यास व्यक्तीला चालणे – फिरणे कठीण जाते.
  5. ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांना बोलताना अडचण येते. त्यांच्या तोंडातून निघणारे उच्चार अस्पष्ट असतात.
  6. अनेक परिस्थितींमध्ये ब्रेक स्ट्रोक झाल्यास पॅरालाईजची स्थिती उद्भवू शकते.

ब्रेक स्ट्रोक होऊ नये यासाठी काय करावे?

  1. (Brain Stroke) रक्तदाब, कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवणे.
  2. धूम्रपान आणि तंबाखूसारख्या पदार्थांचे सेवन कमी करणे वा टाळणे.
  3. निरोगी आणि सकस आहाराचे सेवन करणे.
  4. नियमित शारीरिक हालचाली करणे. यासाठी व्यायाम आणि चालणे फायदेशीर ठरेल

याशिवाय ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोणतेही उपचार करणे फायदेशीर आहे. तसेच जीवनशैलीत बदल करताना आरोग्य तज्ञांचा सल्ला घ्यावा. (Brain Stroke)