सोन्याच्या दरात आजही घसरण ! पहा 22 आणि 24 कॅरेट साठी किती रुपये मोजावे लागतील

gold rate 13-11-24
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आज शनिवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी मागच्या दोन दिवसाप्रमाणेच सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत कमी होऊन 79 हजार 360 रुपये प्रति दहा ग्रॅम येथे झाली आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 79 हजार 510 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे तर चांदीच्या बाबतीत बोलायचं झालं तर चांदीची किंमत 94 हजार रुपये प्रति किलोग्राम वर आहे.

यंदाच्या वर्षी सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला अगदी काही दिवसातच सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅम 80 हजार रुपयांपर्यंत गेले होते. त्यानंतर आता अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका झाल्यानंतर सोन्याच्या दरामध्ये घट होत असल्याचे दिसून येत आहे. मागचे सलग दोन दिवस सोन्याचे दर उतरले असताना आज देखील सोन्याच्या दरामध्ये काहीशी घसरण झाले आहे

22 कॅरेट

आज देशात तुम्हाला बावीस कॅरेट सोनं एक ग्राम खरेदी करायचं असेल तर त्यासाठी 7275 रुपये मोजावे लागतील. तर दहा ग्रॅम सोनं 22 कॅरेट मध्ये खरेदी करायचं असेल तर 72 हजार 750 रुपये मोजावे लागतील. आज दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याच्या दरामध्ये शंभर रुपयांची घसरण झाली आहे.

24 कॅरेट

आज एक ग्रॅम 24 कॅरेट सोनं तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 7936 मोजावे लागतील. कालचा एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर हा 7947 रुपये इतका होता त्यामुळे आज 11 रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे. तर तुम्हाला दहा ग्रॅम 24 कॅरेट सोनं खरेदी करायचं असेल तर त्याची किंमत 79360 रुपये इतकी आहे आज 24 कॅरेट दहा ग्राम सोन्याच्या दरामध्ये 110 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे

18 कॅरेट

आणि जर तुम्हाला एक ग्रॅम 18 कॅरेट सोनं खरेदी करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आज 5952 मोजावे लागतील. तर दहा ग्राम 18 कॅरेट सोनं खरेदी करायचं असेल तर 59520 रुपये लागतील