उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मिळणार कर्ज ; काय आहे विद्यालक्ष्मी योजना ? कसा कराल अर्ज ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक गोरगरीब मुलांना पैशाअभावी शिक्षण पूर्ण करता येत नाही . अशा सर्व मुलांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज आणि शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिले जाते. तसेच विद्यालक्ष्मी योजनाचा फायदा विद्यार्थ्यांना एका क्लिकवर मिळावा, यासाठी सरकारने विद्यालक्ष्मी पोर्टल नावाचे ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थी अनेक बँकांकडून शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करू शकतात, तसेच शिष्यवृत्ती मिळवण्यासाठीही अर्ज करू शकतात. त्यामुळे आता शिक्षण घेणे सोपे झाले आहे.

अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी

विद्यालक्ष्मी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे. यासाठी तुम्हाला प्रथम रजिस्ट्रेशन करावे लागेल . सर्वप्रथम विद्यार्थी विद्यालक्ष्मी पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. लिंक ओपन झाल्यानंतर तिथे रजिस्ट्रेशनच्या पर्यायावर क्लिक करून नाव, पत्ता, ईमेल आयडी, आणि इतर आवश्यक माहिती भरावी . रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना एक युजर आयडी आणि पासवर्ड दिला जाईल, ज्याच्या मदतीने ते पोर्टलवर लॉग इन करू शकतात.

महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक

लॉग इन केल्यानंतर पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी उपलब्ध पर्याय निवडा. त्यानंतर आवश्यक शैक्षणिक माहिती, कुटुंबाचे उत्पन्न, व अन्य तपशील अचूक भरावा. अर्जासोबत काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. त्यामध्ये आधार कार्ड , कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र , इयत्ता 12 वीची गुणपत्रिका , जातप्रमाणपत्र , रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे लागतील.

शिक्षणाच्या संधीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल

अर्ज भरल्यानंतर त्यात दिलेली माहिती व्यवस्थित तपासून पहावी . सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करून अर्ज सबमिट करा. अर्ज सबमिट केल्यानंतर तो पोर्टलद्वारे तपासला जाईल. त्यानंतर मग अर्ज स्वीकारण्यात आल्यास विद्यार्थ्यांना ई-मेल आणि मेसेजद्वारे कळवण्यात येईल. विद्यालक्ष्मी योजना ही आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी विस्तारित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक अडचणींना दूर करून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी आवश्यक पाठबळ मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळ न घालवता विद्यालक्ष्मी पोर्टलवर भेट द्यावी आणि या योजनेचा लाभ घ्यावा.