अमृत भारत योजनेअंतर्गत पुणे विभागातील 16 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचं काम गेल्यावर्षी हाती घेण्यात आलं. काम सुरू होऊन सात ते दहा महिने झाले असले तरी काहीच स्थानकांवर केवळ 30 ते 35 टक्केच काम पूर्ण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. ही कामे पूर्ण होण्यास अजून एक वर्ष लागण्याची शक्यता आहे.
पुनर्विकास यादीत ‘या’ स्थानकांचा समावेश
अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत पुणे विभागातील कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, कराड, सातारा, वठार, लोणंद, तळेगाव, देहू रोड, आकुर्डी, चिंचवड, हडपसर, उरळी, कडेगाव, बारामती आणि फलटण या 16 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. 5 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कामांचा ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.
केवळ 30 ते 40 टक्केच काम पूर्ण
आकुर्डी तळेगाव आणि चिंचवड या रेल्वे स्थानकांचा काम एक वर्ष होऊनही केवळ 30 ते 40 टक्केच झाले आहे. या तीनही रेल्वे स्थानकांवरून दररोज 42 लोकल आणि पाच एक्सप्रेस ये-जा करतात यातून दररोज हजारो ठिकाणी प्रवासी प्रवास करत असतात. मात्र या ठिकाणी ठेकेदारांकडून अत्यंत संत गतीने काम सुरू असून चिंचवड स्थानकाचे तर आतापर्यंत केवळ 30 ते 40 टक्केच काम पूर्ण झाल्याची माहिती आहे. पुनर्विकास करण्यासाठी स्थानकांवर खड्डे खोदून ठेवल्याने प्रवाशांना नहक त्रासाला सामोरे जावे लागतय.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी सांगितलं की, अमृतभारत योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकाचे काम सुरू झालं असून काही ठिकाणी काम संपत आली आहेत तर काही ठिकाणी सुरू आहेत. लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात येणार आहेत.
योजनेअंतर्गत ही काम केली जाणार
रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण
प्रवेशद्वारावर पोर्चची तरतूद
प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे आणि शेड उभारून अच्छादित करणं
स्टेशनच्या दर्शनी भागात सुधारणा आणि स्टेशन इमारतीची उंची वाढवणे
रॅम्प , लिफ्ट ,एक्सलेटर सह बारा मीटर रुंद मध्यवर्ती फूट ओव्हर ब्रिज तयार करणे