WhatsApp Feature: WhatsApp वरून Online Meeting? लाँच झालं नवं फिचर

0
1
Whatsapp Feature
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp Feature– WhatsApp फक्त एक मेसेजिंग अँप नाही, तर आता याच्या मदतीने तुम्ही ऑनलाईन मीटिंग्सदेखील करू शकता. आजच्या काळात काम करण्याचा प्रकार बदलला आहे. ऑफिसमधील लोकांसाठी वर्चुअल मीटिंग्स हे एक सामान्य तंत्र बनले आहे. काही लोकांना रोज अनेक ऑनलाईन मीटिंग्स अटेंड कराव्या लागतात. आता व्हाट्सएपचे एक नवीन फीचर तुम्हाला आपली ऑनलाईन मीटिंग्स आयोजित करण्यात मदत करेल. त्यामुळे वेगवेगळ्या अँप्सवर मीटिंग्स अटेंड करण्याची गरज नाही. तर चला त्या फीचर्सची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

WhatsApp वर मीटिंग शेड्यूल (WhatsApp Feature)-

सर्वात प्रथम तुमच्या फोनमध्ये WhatsApp ओपन करा .त्यानंतर त्या ग्रुपमध्ये जा ज्यामध्ये तुम्ही मीटिंग शेड्यूल करू इच्छिता. येथे तुम्हाला मेसेज बारमध्ये पेपर क्लिप आयकॉन दिसेल, त्यावर टॅप करा आणि नंतर इव्हेंट पर्यायावर क्लिक करा. यानंतर एक इव्हेंट तयार करा. इव्हेंटचे नाव, तारीख आणि वेळ सेट करा. जर तुम्हाला मीटिंगसाठी लिंक शेअर करायची असेल तर टॉगल ओन करा. नंतर तुम्ही सेंड आयकॉनवर क्लिक करा. यानंतर ग्रुपच्या सर्व सदस्यांना तुमच्या शेड्यूल केलेल्या वेळेस एक नोटिफिकेशन मिळेल, ज्यामध्ये मीटिंग जॉइन करण्यासाठी लिंक असेल. त्या लिंकवर क्लिक करून ग्रुपचे सदस्य मीटिंग जॉइन करू शकतात.

सोप्या पद्धतीने मीटिंग्स शेड्यूल करू शकता –

अशाप्रकारे व्हाट्सएपच्या (WhatsApp Feature) या फीचरचा वापर करून तुम्ही सोप्या पद्धतीने तुमच्या ऑनलाइन मीटिंग्स शेड्यूल करू शकता आणि वेगवेगळ्या अँप्सवर जाण्याची आवश्यकता भासणार नाही.