जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या WhatsApp मध्ये वापरकर्त्यांच्या सोयी आणि गरजा लक्षात घेऊन दररोज नवीन वैशिष्ट्ये जोडली जातात, जेणेकरून जगभरातील दोन अब्जाहून अधिक वापरकर्ते त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतील. या प्रयत्नात व्हॉट्सॲपने आपल्या लाखो वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर आणले आहे.
मार्क झुकरबर्गने केली नवीन अपडेटची घोषणा
व्हॉट्सॲपच्या मालकीची कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी नवीन ‘कस्टम लिस्ट’ फीचरची घोषणा केली आहे. या फीचरच्या मदतीने, व्हॉट्सॲप वापरकर्ते त्यांचे आवडते संपर्क आणि गट वेगवेगळ्या श्रेणींमध्ये व्यवस्थापित करू शकतील आणि नंतर त्यांचे मित्र, नातेवाईक किंवा इतर महत्त्वाच्या लोकांशी अगदी सहजपणे चॅट करू शकतील. हे फीचर हळूहळू अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी आणले जात आहे.
सहज मिळणार कॉन्टॅक्ट लिस्ट
- नवीन कस्टम लिस्ट फीचरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला आधी व्हॉट्सॲप अपडेट करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला चॅट टॅबवर जावे लागेल.
- येथे चॅट लिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ‘+’ आयकॉनवर क्लिक करावे लागेल.
- कस्टम लिस्ट फीचरच्या मदतीने तुम्ही वापरकर्त्याची वैयक्तिक यादी तयार करू शकता.
- आवडत्या लोकांची आणि गटांची यादी देखील स्वतंत्रपणे तयार केली जाऊ शकते.