WhatsApp : चे नवीन फीचर ! आता व्हिडिओ कॉलवर देऊ शकता इफेक्ट, फक्त ‘हे’ सेटिंग चालू करा

whats app
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

WhatsApp : व्हॉट्सॲपने जगातील 180 देशांमध्ये आपले नेटवर्क पसरवले आहे. लोक सकाळी उठल्याबरोबर त्यांचे व्हॉट्सॲप चेक करतात आणि झोपेपर्यंत व्हॉट्सॲपवर सक्रिय राहतात.आजकाल लोक त्यांचे कामही या इन्स्टंट मेसेजिंग ॲपद्वारे करतात. अनेकजण आपल्या छोट्या मोठ्या व्यवसायाचे ब्रॅण्डिंग याद्वारे करतात. एकवढेच काय शाळेतील शिक्षक सुद्धा पालकांसोबत या अँप वरून कनेक्ट राहतात. व्हॉट्सॲप चे (WhatsApp) फीचर्स देखील कंपनीकडून सतत अपडेट केले जातात, जेणेकरून यूजर्सना चांगला अनुभव मिळू शकेल. याआधीही अनेक नवीन फीचर्स युजर्सना देण्यात आले आहेत. आता त्यात आणखी एका फीचरची भर पडली असून त्यामुळे व्हॉट्सॲप वापरण्याचा अनुभव आणखी मजेदार व्हायला मदत होणार आहे.

नवीन फिचर (WhatsApp)

दरम्यान, कंपनीने व्हॉट्सॲपवर एक नवीन सेटिंग अपडेट केली आहे, जे व्हिडिओ कॉलशी संबंधित आहे. याद्वारे व्हिडीओ कॉल्स अधिक प्रभावी आणि सुंदर होतील. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील हे वैशिष्ट्य तुम्हाला Instagram ची आठवण करून देईल. उदाहरणार्थ, Instagram वर व्हिडिओ कॉल दरम्यान विविध प्रकारचे इफेक्ट लागू करण्याचे पर्याय आहेत. त्याचप्रमाणे आता व्हॉट्सॲपच्या (WhatsApp) व्हिडिओ कॉलिंगवरही सर्व प्रकारचे इफेक्ट्स दिसणार आहेत. यासाठी तुम्हाला फक्त काही सेटिंग्ज चालू कराव्या लागतील.

ही सेटिंग चालू करा (WhatsApp)

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला व्हॉट्सॲप ओपन करावे लागेल.
  • येथे तुम्हाला 3 ठिपके दिसतील.
  • येथे सेटिंग्ज पर्यायावर क्लिक करा.
  • त्यावर क्लिक करताच तुम्हाला प्रायव्हसीचा पर्याय दिसेल.
  • या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला कॅमेरा इफेक्टचा पर्यायही दिसेल.
  • तुम्ही हे फीचर चालू करताच.
  • त्याचप्रमाणे, तुम्हाला व्हिडिओ कॉलवर अनेक प्रभाव पर्याय मिळतील.

बॅग्राऊंड बदलता येणार (WhatsApp)

या सेटिंगद्वारे, तुम्ही तुमच्या WhatsApp कॉलचे बॅग्राऊंड बदलू शकता आणि सर्व प्रकारचे इफेक्ट जोडू शकता. येथे तुम्हाला इतर अनेक पर्याय पाहायला मिळतील, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार इफेक्ट सेट करू शकता. तुम्ही हे वैशिष्ट्य वापरू शकता.