हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हाट्सअँप नेहमीच त्यांच्या ग्राहकांना खुश करण्यासाठी वेगवेगळे फीचर्स घेऊन येत असतात. त्यामुळे ग्राहकांना विविध सेवा सुविधा मिळतात. ज्यामुळे हे मेसेजिंग अँप सोपे , आकर्षक अन स्मार्ट बनण्यास मदत होते. आताही ग्राहकांसाठी व्हाट्सअँपने भन्नाट 5 फीचर्स सादर केले आहेत. ज्यात चॅट कस्टमायझेशन, अपडेटेड नोटिफिकेशन्स, न वाचलेले मेसेजेस काउंट, व्हिडिओ प्ले बॅक स्पीड आणि एआय इंटिग्रेशनच्या फीचर्सचा समावेश असणार आहे. तर चला या दमदार फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
चॅट कस्टमायझेशनसाठी रंगीबेरंगी थीम्स –
व्हाट्सअँपणे आता वापरकर्त्यांसाठी चॅट कस्टमायझेशनसाठी रंगीबेरंगी थीम्सची जबरदस्त सेवा प्रदान केली आहे. याआधी वापरकर्त्यांकडे केवळ काहीच बॅकग्राऊंड्सचे पर्याय होते, पण आता वापरकर्त्यांना 20 रंगीबेरंगी थीम्स आणि 30 नवीन वॉलपेपर मिळणार आहेत. या नवीन फीचरमुळे वापरकर्ते आवडते रंग निवडून चॅट्स आकर्षित बनवू शकणार आहेत.
चॅट नोटिफिकेशन्समध्ये सुधारणा –
व्हाट्सअँपने चॅट नोटिफिकेशन्समध्ये सुधारणा केली आहे. ज्याद्वारे वापरकर्त्यांना मेसेज नोटिफिकेशन्सवर अधिक चांगले नियंत्रण मिळवता येणार आहे. बऱ्याच वापरकर्त्यांना न वाचलेले मेसेजेस दर्शवणारा डॉट त्रासदायक वाटतो. पण या फीचरमुळे हा त्रास कमी होणार आहे. हे नवीन फिचर तुम्हाला नोटिफिकेशन सेटिंग्समध्ये उपलब्ध होणार आहे.
मेसेज काऊंटर फिचर –
व्हाट्सअँपने चॅट फिल्टर्स आणि न वाचलेले मेसेजेस दाखवणारा काऊंटर जोडून वापरकर्त्यांसाठी मेसेज व्यवस्थापन अधिक सुलभ केले आहे. यामुळे, वापरकर्त्यांना महत्त्वाचे मेसेजेस वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये व्यवस्थित पाहता येतात आणि न वाचलेले मेसेजेस सहज ओळखता येतात. या सुधारणा वापरकर्त्यांना त्यांच्या संवादांवर अधिक नियंत्रण ठेवण्यास आणि कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतात.
व्हिडिओ प्ले बॅक स्पीड वाढवता येणार –
व्हाट्सअँपने एक नवीन फीचर लाँच केले आहे ज्यामुळे वापरकर्त्यांना व्हिडिओ प्ले बॅक स्पीड 1.5x किंवा 2x पर्यंत वाढवता येईल. याआधी , ही सुविधा फक्त व्हॉइस नोट्ससाठी उपलब्ध होती, पण आता व्हिडिओंमध्येही वापरता येते. यामुळे लांब व्हिडिओ पाहताना वेळ वाचवणे सोपे होईल, विशेषतः कामाच्या किंवा शिकवणीच्या उद्देशाने. हे फीचर सहजपणे सेटिंग्जमध्ये जाऊन वापरता येते , ज्यामुळे व्हाट्सअँपचा व्हिडिओ अनुभव अधिक कार्यक्षम आणि सुलभ होणार आहे.
मेटा एआय विजेट
व्हाट्सअँपने मेटा एआय विजेटसाठी एक नवे आणि अत्याधुनिक फीचर आणले आहे , जे वापरकर्त्यांना त्यांच्या फोनच्या होम स्क्रीनवर सहजपणे एआय चॅटबोटसाठी लगेच प्रवेश प्रदान करतो. एकदाच टॅप करून, वापरकर्ते संदेश पाठवणे, कामांची यादी तयार करणे आणि अन्य कार्ये सोप्या पद्धतीने पार करू शकतात. यामुळे वापरकर्त्यांना अधिक जलद, सुलभ आणि कार्यक्षम अनुभव मिळेल, आणि व्हाट्सअँपचा वापर अधिक आकर्षक आणि स्मार्ट बनेल.