वाह क्या बात ! व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर, व्हॉईस नोट्सला टेक्स्टमध्ये बदलणार

whatsapp
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हाट्सअँप नेहमी आपल्या नवनवीन कल्पना वापरून अनेक योजना आखत असते . ज्यामुळे लोकांना आधुनिक फीचर्सचा अनुभव घेता येतो. व्हाट्सअँपचे वापरकर्ते प्रचंड असून , जर तुम्ही एक्टिव्हली वापरत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. नवीन फीचरमध्ये व्हाट्सअँप आता असं फिचर घेऊन येणार आहे , ज्यामुळे तुमच मोठं टेन्शन दूर होईल. यांनी व्हॉईस नोट्सला टेक्स्टमध्ये बदलणारं नवीन फीचर लाँच केले असून, त्यामुळे तुम्हाला नोट्स वाचता येणार आहेत. ज्या लोकांना काही कारणास्तव नोट ऐकता येत नाही , त्यांच्यासाठी हे नवीन फीचर्स फायदेशीर ठरणार आहे.

एक नवीन फीचर लाँच

व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन फीचर लाँच केले आहे, ज्याद्वारे युजर्स आता व्हॉईस नोट्सचे सहजपणे टेक्स्टमध्ये रूपांतर करू शकतात. हे फीचर वापरणं अत्यंत सोपं आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन चॅट्सवर क्लिक करावं लागेल, त्यानंतर व्हॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्शन या पर्यायावर जाऊन हे फीचर सुरू किंवा बंद करू शकता. तसेच तुम्ही तुमच्या आवडीची भाषा देखील निवडू शकता.

युजर्सच्या सुरक्षा आणि गोपनीयतेला प्राधान्य

हे केल्यानंतर व्हॉईस नोटवर क्लिक करून आणि ट्रान्सक्राइबवर क्लिक केल्यावर व्हॉट्सअ‍ॅप तुमच्या व्हॉईस नोटला लगेच टेक्स्टमध्ये रूपांतरित करणार आहे . युजर्स हे टेक्स्ट आपापल्या सोयीनुसार वाचू शकतात. या प्रक्रियेत सर्व काम तुमच्या फोनवरच होत असून , त्यामुळे तुमची प्रायव्हसी पूर्णपणे राखली जाते. व्हॉट्सअ‍ॅप किंवा अन्य कोणतीही तुमच्या व्हॉईस नोट्समध्ये प्रवेश करू शकत नाहीत, यामुळे युजर्सच्या सुरक्षा आणि गोपनीयतेला प्राधान्य दिलं जातं.

विविध भाषांमध्ये उपलब्ध

व्हॉट्सअ‍ॅपने नेहमीच युजर्सच्या गोपनीयतेला महत्त्व दिलं आहे. व्हॉईस नोट्सचे टेक्स्टमध्ये रूपांतर करत असताना, सर्व डेटा तुमच्या डिव्हाईसवरच प्रक्रिया होतो, यामुळे इतर सर्व्हरवर कोणताही डेटा पाठवला जात नाही. सध्या हे फीचर काही भाषांमध्ये उपलब्ध आहे, पण लवकरच अजून भाषा ऍड केल्या जाणार आहेत. हे नवीन फीचर लवकरच संपूर्ण जगभरातील व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी उपलब्ध होईल, ज्यामुळे युजर्सला अधिक सोयीचे आणि सुरक्षित व्हॉईस नोट ट्रान्सक्रिप्शन अनुभवता येईल.