22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात एकामागून एक कठोर निर्णय घेतले असून त्याचा थेट परिणाम दोन्ही देशांमधील व्यापारावर होण्याची चिन्हं आहेत. यातून भारतीय बाजारपेठेत काही महत्त्वाच्या वस्तू महाग होण्याची शक्यता आहे, जी सामान्य ग्राहकांच्या खिशाला चटके देऊ शकते.
भारताचे मोठे पाऊल
- सिंधू जल करार तात्पुरता स्थगित
- सार्क व्हिसा रद्द
- SVES व्हिसाधारकांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश
- पाकिस्तानच्या अधिकृत एक्स (Twitter) अकाउंटवर बंदी
हे सगळे निर्णय केवळ राजकीय नाहीत, तर त्याचे गंभीर आर्थिक परिणाम देखील दिसू लागले आहेत.
आता या वस्तू महागणार!
- ड्रायफ्रूट्स
पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होणारे बदाम, अक्रोड, खजूर यासारखे ड्रायफ्रूट्स भारतात अत्यंत लोकप्रिय आहेत. आता आयात थांबल्यास किंवा मर्यादित झाल्यास त्यांच्या किमती गगनाला भिडू शकतात.
- सेंधव मीठ
भारतात प्रसिद्ध असलेले गुलाबी सेंधव मीठ (Rock Salt) मुख्यतः पाकिस्तानमधून येते. पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात त्याचे उत्पादन होते. संबंध तुटल्यास भारतात मीठाच्या किमतीत झपाट्याने वाढ होऊ शकते.
- ऑप्टिकल लेन्स
चष्म्यांमध्ये वापरली जाणारी ऑप्टिकल लेन्ससुद्धा पाकिस्तानमधून आयात केली जाते. या उत्पादनांची मागणी देशात खूप आहे. आता या लेन्स महाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- इतर वस्तू
याशिवाय पाकिस्तानमधून भारतात येणाऱ्या सीमेंट, मुलतानी माती, कॉटन, स्टील, फळं, आणि चामड्याच्या वस्तूंवरही परिणाम होईल. हे सगळे आयात थांबवल्यास भारतीय बाजारात किंमती वाढू शकतात.
ग्राहकांनी काय करावे?
- स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्यावे
- पर्यायी देशांमधून येणाऱ्या वस्तूंविषयी माहिती ठेवावी
- गरजेइतक्याच खरेदीवर भर द्यावा
राजकीय संघर्षाचा आर्थिक फटका ग्राहकांना बसतो हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आता केवळ सीमारेषेवर नव्हे, तर घराघरातही या तणावाचे परिणाम जाणवणार आहेत.




