हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील घाऊक महागाई (Wholesale Inflation) दरात झालेल्या घसरणीमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मार्च 2025 मध्ये वार्षिक घाऊक महागाई 2.05 टक्क्यांनी घसरली असून तज्ज्ञांनी यापूर्वी 2.5 टक्क्यांचा अंदाज वर्तवला होता. मंगळवारी (15 एप्रिल) जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, अन्नधान्य, वीज, आणि इतर आवश्यक वस्तूंच्या किंमतीत मर्यादित वाढ झाल्याने ही घसरण झाली आहे. तर चला या बातमीबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.
घाऊक महागाई –
घाऊक महागाई (Wholesale Inflation) म्हणजे घाऊक बाजारात वस्तूंच्या किंमती वाढण्याचा दर. म्हणजेच जेव्हा उत्पादक किंवा वितरक (उदा. शेतकरी, फॅक्टरी, होलसेल व्यापारी) त्यांच्या मालाची किंमत वाढवतात, तेव्हा घाऊक महागाई वाढते.
मार्च महिन्यात घाऊक अन्नधान्य महागाई दर –
मार्च महिन्यात घाऊक अन्नधान्य महागाई दर 5.94% वरून 4.66% वर घसरला आहे. तर प्राथमिक वस्तूंची महागाई फेब्रुवारीतील 2.81% वरून 0.76% इतकी नोंदवली गेली आहे. किरकोळ महागाईचा दर फेब्रुवारी महिन्यात 3.61% होता, जो गेल्या सात महिन्यांतील नीचांकी स्तर होता. जानेवारीमध्ये हा दर 4.31% होता. मंगळवारीच सरकारने किरकोळ महागाईचे आकडेही जाहीर केले.
RBI चा अंदाज –
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीने (MPC) अंदाज वर्तवताना सांगितले की, अन्नधान्याच्या किंमती कमी झाल्यामुळे महागाईचा आलेख खाली सरकला आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये महागाई दर सरासरी 4% राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
RBI चा त्रैमासिक अंदाज –
एप्रिल-जून – 3.6%
जुलै-सप्टेंबर – 3.9%
ऑक्टोबर-डिसेंबर – 3.8%
जानेवारी-मार्च – 4.4%




