ऑफिसमध्ये करंट बसण्याचे प्रमाण वाढले ? जाणून घ्या कारण

current
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आपण ऑफिसमध्ये काम करत असताना किंवा घरी असताना अचानक एखाद्याला स्पर्श केल्यावर विजेचा हलका धक्का बसतो का? ही घटना अनेकदा घडते, पण यामागचे कारण काय आहे? नेहमीच्या लाइफस्टाइलमध्ये या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो, पण या छोट्या घटनांच्या मागेही एक वैज्ञानिक कारण असते. चला, याचा सखोल अभ्यास करूया!

शरीर आणि इलेक्ट्रिक चार्ज यांचं नातं

आपल्या शरीरात सतत विद्युत प्रक्रिया होत असते. आपल्या शरीरातील नसा (nerves) एक प्रकारच्या कोटिंगने झाकलेल्या असतात, ज्याला म्येलिनशीथ (Myelin Sheath) म्हणतात. हे कोटिंग आपल्या शरीरातील विद्युत प्रवाह संतुलित ठेवण्याचे काम करते.

दीर्घकाळ एकाच स्थितीत बसल्यास

शरीरातील इलेक्ट्रॉन्स असंतुलित होतात.
अचानक कोणी स्पर्श केल्यास म्येलिन शीथ सक्रियहोते.
त्यामुळे करंट बसल्यासारखं वाटतं.

ऑफिसमध्ये करंट जाणवण्यामागचं कारण?

इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा परिणाम
ऑफिसमध्ये संगणक, प्रिंटर, एसी यांसारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर होतो. यामुळे वातावरणात स्थिर विद्युत (Static Electricity) तयार होतो.

कपडे आणि खुर्चीमधून निर्माण होणारा चार्ज

प्लास्टिकच्या खुर्चीवर बसल्यावर शरीरातील इलेक्ट्रॉन्स गोळा होतात.
खुर्ची आणि कपड्यांमधील घर्षणामुळे पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो.
खुर्चीवरून उठताना चार्ज डिस्चार्ज होतो आणि करंट जाणवतो.

पाय जमिनीला स्पर्श नसल्याने करंट वाढतो

खुर्चीवर बसताना पाय जर जमिनीला टेकले नाहीत, तर शरीरात जमा झालेला चार्ज बाहेर पडत नाही.
त्यामुळे खुर्चीला स्पर्श केल्यावर अचानक करंट बसतो.

करंट जाणवणं धोकादायक आहे का?

नाही! हा करंट हानीकारक नसतो,कारण तो स्थिर विद्युत प्रवाहामुळे होतो.
मात्र, वारंवार करंट जाणवत असेल, तर ऑफिसमधील इलेक्ट्रिकल ग्राउंडिंग योग्य आहे का, याची तपासणी गरजेची आहे.

करंट टाळण्यासाठी हे सोपे उपाय


रबरी किंवा लाकडी फर्निचरचा वापर करा.
नियमित वेळेनुसार खुर्चीवरून उठून हालचाल करा.
जमिनीला स्पर्श होत राहील, याची काळजी घ्या.
ह्यूमिडिफायर वापरून ऑफिसमधील आर्द्रता संतुलित ठेवा.

थोडा करंट पण मोठी शंका? आता उत्तर मिळालं

ऑफिसमध्ये किंवा घरी अचानक करंट जाणवत असेल, तर घाबरण्याचं कारण नाही. हे एक नैसर्गिक वैज्ञानिक कारण आहे, जे आपल्या शरीरातील इलेक्ट्रिक चार्जमुळे होतं. त्यामुळे काळजी करू नका, फक्त वरील सावधगिरीचे उपाय अवलंबवा आणि करंट फ्री कामाचा आनंद घ्या!