‘… म्हणून आदिशक्तीची दिव्य देवस्थाने डोंगरमाथ्यावर असतात’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतात धार्मिक परंपरेला मोठे महत्व आहे. तसेच श्रद्धा, भक्ती, पूजा विधींना देखील विशेष स्थान आहे. त्यामुळे भारतात वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या धर्माची लोक सकारात्मक शक्तीला कायम वंदन करतात. महाशिवरात्र असो किंवा नवरात्र देशभरात हे धार्मिक सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. आपण पाहिले असेल की, वर्षाचे बाराही महिने काही देवस्थानांना भाविकांची मोठी गर्दी असते. यामध्ये देवीच्या मंदिरांचा विशेष समावेश आहे. तुम्ही कधी या गोष्टीकडे लक्ष दिलंय का? बहुतेक देवींची मंदिरे ही उंच डोंगरावर वसलेली आहेत. आता असं का? याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता जर तुमच्याही मनात असेल तर चला लगेच जाणून घेऊया.

‘.. म्हणून पर्वतावर निवास करते आदिशक्ती’

अनेक धर्मग्रंथ, पुराण, वेदांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे विश्वाचे मूळ हे दैवी शक्ती आहे. ही पृथ्वी ५ तत्वांनी मिळून तयार केलेली आहे. ज्यामध्ये जल, वायू, अग्नी, भूमी आणि आकाश यांचा समावेश आहे. भूमी देवता म्हणजे शिव, वायू देवता अर्थात विष्णू, जल देवता गणेश, अग्नी देवता अग्निदेव आणि आकाश देवता म्हणजे सूर्य असे यामध्ये म्हटले आहे. असे असले तरीही देवीच्या मूळ स्वरूपाला आदिशक्ती म्हजनेच सर्वोच्च शक्ती म्हटले गेले आहे. तर पर्वतांना पृथ्वीचा मुकुट आणि सिंहासन असे संबोधण्यात आले आहेत. म्हणूनच बहुतेक देवींचे स्थान हे उंच डोंगरावर वा शिखरावर असल्याचे म्हटले जाते.

याशिवाय आणखी एक कारण असे सांगितले जाते की, प्राचीन काळी ऋषी- मुनींनी एक शंका व्यक्त केली होती. ती शंका अशी होती की, त्यांच्याकडे जी काही सपाट जमीन असेल ती मानव वापरतील आणि कुठेही एकटेपणा राहणार नाही. यात नामस्मरण, तप आणि चिंतनासाठी एकांत महत्त्वाचा असेल. त्यामुळे अशावेळी पर्वतशिखरे देवीचे स्थान म्हणून योग्य मानले गेले.

डोंगरावरील वातावरण हे शुद्ध, शांत , निसर्गाशी संबंध राखणारे आणि विशेष म्हणजे कमी वर्दळ असणारे असते. त्यामुळे अशा ठिकाणी सकारात्मक ऊर्जा जास्त जाणवते आणि म्हणून बहुतेक देवस्थाने ही उंच डोंगरावर स्थित आहेत.

आख्यायिका

विविध आख्यायिकांनुसार, पतीचा अपमान झाल्याने क्रोधीत माता सतीने पिता दक्ष यांच्या यज्ञातील अग्नी स्वतःत सामावून घेतली. त्यानंतर सती जन्माचा अंत झाला. मात्र आदिशक्तीच्या दुराव्याने व्याकुळ झालेले महादेव क्रोधीत झाले. माता सतीचा देह घेऊन ते कैलासाच्या दिशेने निघाले. त्यावेळी महादेवांना या स्थितीतून बाहेर काढणे गरेजचे होते. माता सतीपासून वेगळे करणे गरेजचे होते. त्याशिवाय आदिशक्तीच्या पुन्हा जन्म घेणे शक्य नव्हते.

म्हणून भगवान विष्णू यांनी आपले सुदर्शन चक्र माता सतीच्या देहावर चालवले. ज्यामुळे माता सतीच्या देहाचे काही भाग झाले आणि ते पृथ्वीतलावर विविध उंच पर्वत ठिकाणी पडले. हे भाग जिथे जिथे पडले तिथे तिचे देवीचे अंश सक्रिय झाले. त्या प्रत्येक ठिकाणी देवीची भव्य मंदिरे बांधली गेली. या ठिकाणी रक्षक भैरवाने देखील स्थान ग्रहण केले. अशाप्रकारे आदिशक्तीच्या अंश स्वरुपातील स्वयंभू देवस्थाने डोंगर माथ्यावर स्थिरावली.