Indian Railway : ‘या’ शहरात भारतीय रेल्वे उभारणार मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीसह मेगा टर्मिनल्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railway : भारतीय रेल्वेचे जाळे देशभर पसरले असून रेल्वे ही रोजच्या जीवनातील महत्वाचे दळण वळणाचे साधन आहे. भारताची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे लोकसंख्येनुसार पायाभूत सुविधांचा विकास होणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय रेल्वे 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीसह मेगा रेल्वे टर्मिनल्स स्थापन करणार असल्याची माहिती आहे.

हा प्रकल्प म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ व्हिजनचा हा एक भाग आहे. या प्रकल्पाद्वारे पायभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला जातो आहे. याबाबत रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना लोकसंख्या वाढीच्या अपेक्षेने शहरांपर्यंत हा प्रकल्प विस्तारित करण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबत बोलताना अतिरिक्त सदस्य (नियोजन) शिरीष कुमार सिन्हा यांनी सांगितले की, 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येचा आकडा पूर्ण करणाऱ्या शहरांची यादी तयार केली आहे. अतिरिक्त स्थाने/स्टेशन्ससाठी शिफारसी मागवल्या आहेत. अशी माहिती दिली.

द हिंदू च्या रिपोर्टनुसार, झोनल रेल्वेच्या प्रमुख मुख्य यांत्रिक अभियंता (PCMEs) यांना देखरेखीचे काम सोपवण्यात आले आहे, हाऊसकीपिंग आणि देखभाल याची कामे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येनुसार वाढीव दळणवळ सुविधा सुद्धा वाढतील याची अपेक्षा करूया.