महत्वाची बातमी ! सोन्याच्या किंमती 1 लाखाचा टप्पा ओलांडणार ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही महिन्यापासून सोन्याच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली आहे. सणासुदीच्या काळातही लोकांनी सोने खरेदी करण्याचे थांबवले नाही . दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बरेच लोक पैश्यांची जुळवा जुळव करून खरेदी करत होते. या खरेदीमुळे सोन्याच्या दुकानात प्रचंड गर्दी पाहण्यास मिळत होती . यामुळे यंदाही सोन्याच्या किंमतीत आणि विक्रीमध्ये मोठी उलाढाल झालेली दिसून आली आहे. येत्या काही दिवसातच सोन्याच्या किंमती एका लाखाच्या शिखरावर पोहचतील कि काय अशी चिंता लागली आहे. या किंमती वाढीमागे कोणती कारणे असतील , हे आज आपण पाहणार आहोत .

सोन्याच्या भावात उलाढाल

दिवाळीच्या काळात बाजारात आलेले नव्या प्रकारचे दागिने आणि लग्न समारंभामुळे होणारी खरेदी या कारणामुळे सराफ पेठेत खरेदीसाठी गर्दी वाढली आहे . ग्राहकांच्या या प्रतिसादामुळे व्यावसायिकांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. विशेष म्हणजे या दिवाळीत सोन्याच्या विक्रीने मूल्याच्या बाबतीत उच्चांक गाठला असला, तरी वजनाच्या तुलनेत विक्री काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी वजनाने 10 ते 15 टक्के विक्री घटली आहे, पण सोन्याच्या वाढत्या भावामुळे उलाढाल मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामागे युद्ध आणि जागतिक परिस्थिती कारणीभूत ठरू शकते. यामुळे येत्या काही काळातच सोने एका लाखाचा टप्पा पार करणार आहे.

येत्या काही काळात सोन्याचा दर

सोन्याच्या दरवाढीचा खरेदीवर फारसा परिणाम झालेला नाही, उलट दर वाढल्याने वजनाच्या बाबतीत विक्री घटली असली तरी व्यवहाराचे मूल्य वाढले आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते जागतिक परिस्थिती आणि सध्या सुरू असलेल्या युद्धांमुळे सोन्यामध्ये गुंतवणुकीत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत सोन्याचा दर 1 लाख 68 हजार ते 2 लाख रुपयांचा टप्पा गाठेल , अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.