हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Womens Day Special) संपूर्ण जगभरात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. जगभरातील स्त्री वर्गाला समर्पित असलेला हा दिवस ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. महिला सप्ताह, विशेष व्याख्यानं, परिसंवाद, मेळावे, सत्कार, महिलाकेंद्री चित्रपटांचे महोत्सव, वस्त्रालंकारांच्या खरेदीवर सवलती, खास सहली-सफरी अशा वेगवेगळ्या गोष्टींमधून महिलांना आनंद दिला जातो. पूर्वी महिलांच्या पायात बंधने होती. मात्र आजच्या महिला स्वछंदी आहेत. शिवाय समाजाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलला आहे. त्यामुळे आजची स्त्री समाजात आपले विशेष स्थान निर्माण करू शकते आहे.
आजची स्त्री आपले मत बिनधास्त मांडू शकते, आपल्या भावना व्यक्त करू शकते. (Womens Day Special) आजची स्त्री आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी एल्गार पुकारू शकते आणि कुणाच्याही मदतीशिवाय एकटी अख्ख्या जगाशी लढू शकते. एक स्त्री अत्यंत संवेदनशील असते. स्त्रीच्या सहनशीलतेला तोड नाही. मात्र तिच्या सहनशीलतेचा अंत झाला तर ती जे करू शकते त्याचा कुणीच अंदाज लावू शकत नाही. आज आपण अशाच काही धडाकेबाज महिलांच्या अद्भुत कामगिरींचा प्रेरणादायी आढावा घेणार आहोत. ज्याविषयी जाणून तुमचाही उर अभिमानाने भरून येईल.
1. आर्या राजेंद्रन – सर्वात तरुण महापौर
केरळची राजधानी तिरुवनंतपुरमला डिसेंबर २०२० मध्ये देशातील सर्वात तरुण महापौर म्हणून आर्या राजेंद्रन लाभल्या. (Womens Day Special) आपले शहर महिलांसाठी सुरक्षित बनवणे, हे त्यांनी आपले प्रथम प्राधान्य मानले. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या आर्या केरळ राज्य समितीच्या सदस्य आहेत. पालिका निवडणुकीत आर्या यांनी कॉँग्रेसविरोधकाला ५४९ मतांनी पराभूत केले आणि त्यामुळे पक्षाने ६५ वर्षीय ज्येष्ठ नेते जमीला श्रीधरन यांच्याऐवजी आर्या यांची महापौरपदी निवड केली होती.
2. दिव्या गोकुलनाथ – एज्युकेशन इनोव्हेटर (Womens Day Special)
दिव्या गोकुलनाथ या बायजूज लर्निंग अॅपच्या सहसंस्थापक आहेत, फोर्ब्ज इंडियात २०२० च्या श्रीमंताच्या यादीमध्ये पती बायजू रवींद्रन यांच्यासह दिव्या यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यांच्याकडे एकूण २२.३ हजार कोटी इतकी संपत्ती आहे. ‘जीआरई’ पास होण्यासाठी दिव्या यांनी बायजू रवींद्रन यांचे क्लासेस सुरू केले. परीक्षेनंतर त्या अध्यापनात आल्या. ‘जीआरई’ पास झाल्यानंतर मात्र त्यांनी अमेरिकेला न जाता भारतातच एज्युकेशन इनोव्हेटर म्हणून काम केले आणि बायजूज लर्निंग अॅप सुरु केले.
3. अरुंधती काटजू – १५८ वर्षे जुना कायदा रद्द करण्यात मोठी भूमिका
(Womens Day Special) अरुंधती काटजू या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांच्या भाची आहेत. त्यांनी २००५ मध्ये BALLB पूर्ण केल्यानंतर ११ वर्ष वकिली केली. अरुंधती LGBT च्या हक्कासाठी लढा देतात आणि समलैंगिक संबंध गुन्हे मानणारे कलम ३७७ संपवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांनी १५८ वर्षे जुना कायदा रद्द करावा यासाठीच्या नवतेज सिंह जौर विरुद्ध भारत संघ याचिकेत न्यायालयासावर बाजू मांडली. ज्यामुळे एप्रिल २०१० मध्ये टाइम मॅगझिनने जगातील १०० प्रभावशाली चेहऱ्यांमध्ये अरुंधती यांचा समावेश केला.
4. रितू कारिधाल – देशाची रॉकेट महिला
इस्रोमध्ये आज अनेक तंत्रज्ञ कार्यात आहेत. ज्यामध्ये भूमिका यंत्र डिझाइन करण्याची जबाबदारी रितू कारिधाल निभावतात. रितू यांनी चांद्रयान २ चे लक्ष्य साध्य केले आहे. या मोहिमेच्या त्या निदेशक होत्या. बेताची परिस्थिती मात्र स्वयंप्रेरणेच्या जोरावर रितू आज देशाची रॉकेट महिला म्हणून ओळखल्या जात आहेत.
5. मानसी जोशी – कृत्रिम पायाच्या मदतीने बनल्या पॅरा बॅडमिंटन चॅम्पियन
मानसी जोशी या वयाच्या ६व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळत होत्या. मात्र, २०११ मध्ये झालेल्या एका ट्रक अपघातानंतर त्यांचा जीव वाचवण्यासाठी १२ तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये त्यांचा पाय कापावा लागला. परिस्थिती अवघड होती मात्र जिद्दीच्या बळावर त्यांनी करून दाखवलं. (Womens Day Special) अपघातानंतर ४ महिन्यांनी त्यांनी कृत्रिम पाय लावून खेळाच्या मैदानात वापसी केली. २०१४ मध्ये त्या व्यावसायिक खेळाडू झाल्या आणि आज पॅरा बॅडमिंटनची वर्ल्ड चॅम्पियन म्हणून त्यांची ओळख आहे.
6. अपर्णा कुमार – सात महाद्वीपांचे सर्वोच्च शिखर सर केले
अपर्णा कुमार या २०१२ मध्ये उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे नवव्या बटालियन पीएसईमध्ये कमांडंट म्हणून रुजू झाल्या होत्या. आधी १९९२ पर्यंत आयटीबीपीची २० हजार फूट उंची असलेले बॉर्डर आउटपोस्ट या बटालियनजवळ असायचे. यांच्याकडे पर्वतारोहणात वापरलेली १९६५-७०च्या दशकातली उपकरणे होती. जी पाहून अपर्णा याना पर्वतारोहणात इंटरेस्ट वाढला.
(Womens Day Special) यानंतर त्यांनी रजा घेऊन प्रशिक्षण घेतले आणि पर्वतारोहण वा अॅडव्हेंचरचा कोणताही अनुभव नसतानादेखील त्यांनी सात महाद्वीपांचे सर्वोच्च शिखर सर केले. हे महाद्वीप सर करणाऱ्या त्या पहिल्या सरकारी अधिकारी ठरल्या. इतकेच नव्हे तर, अपर्णा कुमार यांनी उत्तराखंडच्या चमोलीतील आपत्तीच्या बचावकार्याची जबाबदारी पार पाडली होती.
7. आयेशा अजीज – सर्वात कमी वयाची कमर्शियल पायलट
आयेशा अजीज यांनी वयाच्या १६ वर्षांत रशियामध्ये जेट मिग २९ विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. यानंतर २०१७ मध्ये त्यांना कमर्शियल पायलटचे लायसन्स मिळाले आणि सध्या त्या जेट मिग २९ विमान उडवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. काश्मीरच्या बारामुल्ला येथील वय वर्ष २५ असणाऱ्या आयेशा अजीज या आज सर्वात कमी वयाची कमर्शियल पायलट म्हणून ओळखल्या जातात.
8. झुबेदा बाई – दागिने विकून बनवले लो कॉस्ट बर्थ किट
झुबेदा बाई यांनी ‘आइस’ हे लो कॉस्ट बर्थ किट तयार केले आहे. आज हे बर्थ किट बनवणारी मोठी कंपनी आहे जिच्या संस्थापक म्हणून झुबेदा बाई काम पाहतात. आज हे लो कॉस्ट बर्थ किट अगदी निःशुल्क वितरित केले जाते. (Womens Day Special) मात्र, एकेकाळी हे किट बनवण्यासाठी झुबेदा यांनी स्वतःचे दागिने विकले होते. या किटमध्ये एकूण ६ गोष्टी असतात. ज्यात अॅप्रन, चादर, साबण, सॅनिटायझर, कॉर्ड क्लिप व सर्जिकल ब्लेड यांचा समावेश आहे.
9. बेनो जेफाइन – पहिल्या दृष्टिहीन IFS अधिकारी
तामिळनाडूच्या बेनो जेफाइन या देशाच्या पहिल्या पूर्ण दृष्टिहीन IFS अधिकारी आहेत. बेनो यांच्या आई त्यांना पुस्तक वाचून दाखवात आणि त्यातील शब्द स्मृतीत साठवून बेनो अभ्यास करत. आईचे शब्द, वडिलांचा आधार आणि आत्मविश्वासाच्या बळावर बेनो यांनी परीक्षा पास केली. आपले ध्येय गाठले आणि भल्याभल्याना अशक्य वाटत होत ते शक्य करून दाखवलं.
10. भावना कांत – कॉम्बॅक्ट मिशनच्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक
बिहारच्या दरभंगा भागातील भावना कांत यांनी बीई पूर्ण केले होते. (Womens Day Special) त्यानंतर २०१६ मध्ये त्या वायुसेनेत फ्लाइंग ऑफिसर म्हणून रुजू झाल्या. त्यांची कामगिरी इतकी प्रभावी होती की, फ्लाइट लेफ्टनंट भावना या कॉम्बॅक्ट मिशनसाठी पात्र ठरलेल्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक ठरल्या. माहितीनुसार, मार्च २०२० मध्ये त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे.
तर या होत्या काही धडाकेबाज महिला ज्यांच्या कामगिरींनी संपूर्ण जग भारावून गेलं. अशी अनेक प्रेरणादायी उदाहरणे या जगात आहेत. आम्हाला वाटते की, या जगातील प्रत्येक स्त्री अद्भुत आहे. त्यामुळे ती कोणत्या ना कोणत्या रूपात कायम आपले वेगळेपण दर्शवत असते. फक्त आपली नजर आणि दृष्टिकोन धूसर असता कामा नये. (Womens Day Special)